Saturday, November 9, 2024

/

असा असणार आहे रोटरी मिड टाऊनचा गरबा फेस्ट 2022

 belgaum

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटानतर्फे दांडिया गरबा फेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 पासून सदर फेस्टला प्रारंभ होणार असून विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी आणि कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ प्राप्त व्हावे या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिनांक 26 रोजी पासून स्पर्धा दि.४ पर्यंत दुपारी 2 ते 5 या वेळेत विविध स्पर्धा पार पडणार आहेत. नवदुर्गा असणाऱ्या महिलांच्या मध्ये असणारे विविध कलागुण या स्पर्धेच्या माध्यमातून सादर व्हावेत आणि कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.नाममात्र प्रवेश शुल्कामध्ये स्पर्धा पार पडणार आहेत. महिला व मुलींना स्पर्धेत सहभागी होण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.

त्यानुसार दिनांक 26 रोजी एलोकेशन म्हणजेच वक्तृत्व ही स्पर्धा असून फ्रीडम फायटर हा विषय आहे. दिनांक 27 रोजी ड्रॉईंग आणि मेहंदी स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेसाठीनेचर हा विषय देण्यात आला आहे. दिनांक 28 रोजी सिंगिंग स्पर्धा पार पडणार असून त्यासाठी भावगीत व भक्ती गीत हा विषय देण्यात आला आहे.दिनांक 29 रोजी रांगोळी स्पर्धा पार पडणार असून कोणत्याही डिझाईन आपल्याला सादर करता येणार आहेत.या चारही स्पर्धांसाठी फीज शंभर रुपये आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथमसाठी 1500, द्वितीयसाठी 1000, तर तृतीयासाठी 500 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

तसेच दिनांक 30 रोजी सोलो डान्स स्पर्धा पार पडणार असून त्यासाठी क्लासिक डान्स असणार आहे. या स्पर्धेसाठी केवळ दोनशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.विजेता स्पर्धकांना अनुक्रमे 2000, 1500 ते 1000 अशी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत.दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ग्रुप डान्स स्पर्धा होणार असून सदर स्पर्धेसाठी पाचशे रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.विजेत्या तीन ग्रुप साठी अनुक्रमे पाच हजार,तीन हजार, व दोन हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.Garba fest 2022

दिनांक 2 रोजी तमाम महिला वर्गासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणारी होम मिनिस्टर स्पर्धा पार पडणार आहे
सदर स्पर्धेसाठी तीनशे रुपये प्रवेश शुल्क असून
आणि होम मिनिस्टर मध्ये विजेत्या पहिल्या महिलेला पैठणी भेटवस्तू देण्यात येणार आहे.दिनांक 3 रोजी एसे रायटिंग स्पर्धा पार पडणार आहे.सदर स्पर्धेसाठी केवळ शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.तसेच दिनांक 4 रोजी रॅम्प वॉक ट्रॅडिशनल ड्रेस थीम या विषयावर स्पर्धा पार पडणार असून सदर स्पर्धेसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धेत विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार आणि दोन हजार चे बक्षीस देण्यात येणार आहे.

यामुळे सदर फेस्ट केवळ दांडिया गरबा फेस्ट नसून स्पर्धेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, मनोरंजन व भेटवस्तू आणि बक्षिसांची लय लूट होणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नीता बीडीकर यांच्याशी संपर्क साधावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.