Sunday, April 28, 2024

/

अरविंद पाटील तुमचं चुकलंच!

 belgaum

सातासमुद्रापलीकडे, पुरुषाच्या बरोबरीने, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांचे योगदान आणि महत्व नाही. २१व्या शतकात आज आपण वावरताना महिलांचे वर्चस्व खुद्द विज्ञानाने मान्य केले परंतु स्वतःला विज्ञानापेक्षा आणि जगापेक्षा मोठ्या समजणाऱ्या, स्वतःला समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या आणि जबाबदारीची पदे सांभाळणाऱ्या लोकप्रिय(?) नेत्यांची बेताल वक्तव्ये म्हणजे हा शुद्ध मूर्खपणा म्हणावा लागेल असा आरोप होत आहे.

आपला उन्मत्त स्वभाव व बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून त्यांनी महिलांनी ‘चुल व मूल सांभाळावे राजकारणात पडू नये’ असे म्हणत आपल्याच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांचा अवमान केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा पक्षासह सर्व स्तरातील नागरिक आणि महिलांमधून निषेध व्यक्त होत आहे.

दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांच्या शोकसभेत व्यासपीठावरून बोलताना अरविंद पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आपल्या उन्मत्त स्वभावाचे दर्शन घडवत खानापूर तालुका महिला प्रभारी डॉ सोनाली सरनोबत यांना लक्ष्य करत आपली जीभ टाळ्याला लावली! महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढेच करावे राजकारणात येऊ नये, महिलांनी केवळ स्वयंपाक घरात भाकरी, चपाती करण्यापूरतेच डोके चालवावे राजकारण करू नये, असे म्हणत त्यांनी समस्त महिलावर्गाचा अवमान केला असा आरोप होत आहे.

 belgaum

शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी अरविंद पाटील आपल्याच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांचा अवमान करण्यात धन्यता मानत आहेत हे पाहून कांही पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ही शोकसभा आहे या व्यासपीठावर राजकीय विषय नको असेही सांगितले. मात्र उन्मत्त माजी आमदारांनी महिलांवर तोंडसुख घेण्यातच धन्यता मानली! असाही आरोप होत आहे.

भाजपच्या खानापूर तालुका महिला प्रभारी असलेल्या डाॅ. सोनाली सरनोबत या अलीकडच्या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील वंचित गोरगरीब जनतेच्या हितासाठी त्या सातत्याने झटत असल्याचे पहावयास मिळते. नागरी समस्या सोडवण्याबरोबरच प्रामुख्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी डॉ. सोनाली सरनोबत यांनी पुढाकार घेतला आहे. जनहितार्थ वारंवार खानापूर तालुक्याचा दौरा करण्याद्वारे त्यांनी तळागाळापर्यंत आपला जनसंपर्क वाढविला आहे. या पद्धतीने पक्ष वाढवून तो अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉ. सोनाली सरनोबत यांचा आजच्या शोकसभेत माजी आमदार अरविंद पाटील यांनी अवमान करण्याच्या प्रकाराचा पक्ष कार्यकर्ते आणि जनतेत निषेध केला जात आहे. यापूर्वी देखील माजी आमदार अरविंद पाटील यांनी तालुक्याच्या विद्यमान आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हातातून माईक हिसकावून घेत त्यांचाही अवमान केला होता याचीही चर्चा होत आहे. Arvind sonali

अरविंद पाटील यांचे स्पष्टीकरण

उमेश कत्ती यांना श्रद्धांजली दिलेल्या कार्यक्रमात खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी महिलांचा अपमान केलेल्या गोष्टीचा इन्कार केला आहे. बेळगाव live नी शनिवारी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. रविवारी स्वता अरविंद पाटील यांनी स्वता बेळगाव live शी संपर्क करून ते वृत्त खोडसाळ आहे.महिलांचा कोणताही अपमान करणारे वक्तव्य केलं नसल्याचे स्पष्ट केले.याबाबत लवकरच खानापूर भाजप कडून भूमिका जाहीर केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

 belgaum

1 COMMENT

  1. Sar badaa Sardar ka, Paiir badaa Murakh Ka.
    There is no point in talking about Aravind Patil, he is nothing less than garden lizard, keeps on changing his colours based on situation.
    If he doesnt get ticket in present party, next day he will be going to some other party & show his different colour.
    Just forgive & forget such insects.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.