गणेशोत्सव पार पडला असून गणरायाचे विसर्जन विविध मंडळांना देण्यात आलेले विद्युत कनेक्शन देखील कट करण्यात आले आहे.मात्र हेस्कॉम चा थोडासा हलगर्जीपणा नागरिकांसाठी धोक्याचा ठरत असून विद्युत खांबावरील कनेक्शन कट करून सदर कनेक्शन वायर तशीच लोंबकळत टाकण्याचा प्रकार आचार्य गल्ली शहापूर येथे घडला आहे
यामुळे गणेश भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सालाबाद प्रमाणे विद्युत खांबामधून गल्लीतील मंडळांना विद्युत पुरवठा करून गणपती विसर्जन होताच सदर विद्युत पुरवठा कट करून सदर मीटर हेस्कॉम कडून नेले जाते.
मात्र सदर विद्युत पुरवठ्याच्या कनेक्शनची वायर तशीच लोंबकळत राहिल्याने धोका निर्माण झाला असून विभागाने आपली जबाबदारी पूर्ण केली असली तरी देखील हा दुर्लक्षितपणा नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
आचार्य गल्ली शहापूर येथील विद्युत खांबावर तसेच विद्युत कनेक्शन असून संबंधित वायर मध्ये वीज पुरवठा खेळत असल्याने कोणाचा हात अथवा धक्का लागल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विशेषता केबल कनेक्शन देखील त्याच खांबावरून गेले असून सातत्याने पाऊस वारा यामुळे केबल कनेक्शन तुटण्याची शक्यता असते. अशावेळी दुरुस्तीच्या कामात केबल ऑपरेटर चा धक्का लागला असता एखादी दुर्घटना घडू शकते यामुळे याची दखल घेत हेच लोंबकळत टाकलेले विद्युत कनेक्शन व्यवस्थित रित्या बंद करावे अशी मागणी केली जात आहे.