देव, देश आणि धर्मासाठी सारे असे म्हणत हजारोंच्या संख्येने तरुणाई दौडमध्ये सहभागी झाली.नवरात्र उत्सवाला आज घटस्थापने पासून प्रारंभ झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. आणि हेच विचार आजच्या तरुण पिढीमध्ये रुजावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दौडला आज भल्या पहाटे प्रारंभ झाला. हाती भगवा ध्वज,मुखी शिवनामाचा जागर आणि पांढरे वस्त्र परिधान करून तरुणाई मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने दौंडमध्ये सहभागी झाली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतींन सालाबाद प्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सवात दौडचे आयोजन करण्यात आले आहे.मागील दोन वर्षी कोरोनामुळे दौडच्या उत्साहाला ब्रेक लागला होता मात्र यावेळी चावडीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.दौड ची सुरुवात छत्रे गुरुजी आणि सहकाऱ्यांनी ध्वज चढवून केली. गल्लोगल्ली भव्य अशा रांगोळ्या, पानाफुलांची सजावट,स्वागत कमानी तसेच शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत जिवंत देखावे यामुळे तर दौड अधिकच खुलून आली.
शिवरायांच्या जयघोषात शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवत हजारो युवक युवती दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या.छत्रपती संभाजी उद्यान पासून दौडला प्रारंभ झाला पुढे हुलबत्ते कॉलनी,शास्त्रीनगर,कपिलेश्वर कॉलनी,समर्थ नगर या भागात दौड फिरली. भगव्या पताका भगवे ध्वज लाल पिवळी झेंडूची फुले आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून दौंड मध्ये सहभागी झालेली तरुणाई यामुळे सारे वातावरण शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले विशेषता बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस देखील या दौडमध्ये सहभागी झाले होते.
कपिलेश्वर मंदिरात आरती करून डी सी पी रवींद्र गडादी,ए सी पी शरणाप्पा,भरमनी यांनी ध्वज उतरवून दौडीची केली सांगता झाली. विशेषतः दुर्गामाता हा पहिला दिवस असल्याने तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले ज्या ज्या मार्गावरून दुर्गामाता दौड गेली त्या त्या मार्गावर करण्यात आलेले स्वागत हे वैशिष्ट्यपूर्ण होते महिला वर्गांनी आरती करून दौड ची शोभा अधिकच वाढवली.