राज्याच्या शिक्षण खात्याने यंदाची दसरा सुट्टी जाहीर केली असून येत्या सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022 पासून 14 दिवस दसऱ्याची सुट्टी असणार आहे.
यंदाच्या दसरा सुट्टीला 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून यावर्षी शिक्षण खात्याने या सुट्टीमध्ये कपात केली आहे. त्यामुळे फक्त 14 दिवस शिक्षक व विद्यार्थ्यांना दसरा सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्यामुळे शाळा विलंबाने सुरू झाल्या. परिणामी विद्यार्थ्यांना दसरा सुट्टी देण्यात आली नव्हती. मात्र यावेळी शैक्षणिक वर्षाला लवकर सुरुवात झाली असली तरी दसरा सुट्टीत कपात करण्यात आली आहे. येत्या गांधी जयंती नंतर सोमवार दि. 3 ऑक्टोबरपासून दसरा सुट्टीला सुरुवात होणार आहे.
त्यानंतर सोमवार दि. 17 ऑक्टोबर पासून शाळा पुनश्च सुरू होणार आहेत त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना फक्त 14 दिवस सुट्टीचा लाभ मिळणार असून त्यामध्ये एका रविवारचा देखील समावेश आहे.