लुटीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असताना चोरीच्या घटना वाढत आहेत. ग्रामीण भागात देखील चोरीच्या घटना वाढल्या असून शहराला लागून असलेल्या येललुर गावात शनिवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. येलूर येथील परमेश्वर नगर मधील बालाजी हे सराफी दुकान फोडत चोरट्यांनी साधारण 5 लाख 50 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. आठ किलो चांदीचे दागिने चोरून चोरटे पसार झाले आहेत.
इंडियन ऑइल चे कार्यालय आणि जिजाऊ हे मेडिकल फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. मात्र त्या ठिकाणी अपयश आल्यानंतर चोरट्यांनी सराफी दुकानाकडे मोर्चा वळवत सर्वजण साखर झोपेत असताना पहाटेच्या वेळी दागिन्यांवर धरला मारला सदर प्रकार जवळच राहणारे विनायक संभाजीचे यांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आवाज दिला मात्र चोरट्यांनी सराफी दुकानाच्या चाव्या त्यांच्या अंगावर फेकत तेथून पळ काढला.
तसेच अवचारहट्टी येथील नंदकुमार कणबरकर यांची दुचाकी देखील चोरट्यांनी लंपास के पळविली आहे यामुळे सदर चोरीची घटना बेळगाव ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून समजतात ग्रामीणचे सीपीआय श्रीनिवास हांडा यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.