Friday, December 27, 2024

/

पावसाची जोरदार बॅटिंग!

 belgaum

बेळगाव शहर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग झाली असून दुपारनंतर संपूर्ण शहर आणि परिसर गारठून गेले आहे. दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुंवाधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सवानिमित्त फुललेली जारपेठेतील गर्दीदेखील दुपारनंतर कमी झाली आहे. शनिवारी दुपारी साधारण तीनच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस दोन तासाहून अधिक वेळ पडत होता.

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पुन्हा पाणी साचले असून अनेक ठिकाणी सखल भागात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा ठरणारा आजचा पाऊस बेळगावकरणासाठी समाधानकारक ठरला आहे.

शनिवारी पडलेला पाऊस विविध परिसरात वळिवाच्या पावसाप्रमाणे बरसला असून शहापूर, वडगाव भागात पावसामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे. दीड तासाहून अधिक वेळ कोसळणाऱ्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.Rainfall ganpt galli

गेल्या आठवड्यापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आठवड्याभरानंतर पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून आज विकेंड असल्याकारणाने अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. अशातच आज शनिवारचा आठवडी बाजार असल्याने बाजारपेठ गर्दीने फुलून आली होती. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे फेरीवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे विक्रेते आणि गणेशोत्सवासाठी लावण्यात आलेले स्टॉल धारक या साऱ्यांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पावसामुळे दुकानांमध्ये बराच वेळ ताटकळत थांबण्याचीही वेळ आली. यामुळे गच्च भरलेल्या बाजारपेठा क्षणार्धात ओस पडल्याचे दिसून आले.

दोन तास ढगांच्या गडगडाटासह संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असून गटारी ओव्हरफूल झाल्याचे चित्र दिसून आले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात ऊष्मां जाणवत होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.