केवळ संचयनी सर्कल ते ग्लोब थेटरपर्यंत गतिरोधक बसवून चालणार नाही तर बेळगाव शहरात ज्या ठिकाणी शाळा कॉलेजीस आहेत अश्या मुख्य रस्त्यांवरवर स्पीड ब्रेकर बसवण्याची गरज आहे व्यक्त होत आहे.
महात्मा फुले रोडवर शनिवारी दुपारी अनियंत्रित कार रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीला धडकली होती मोठा अपघात टळला होता केवळ दुचाकीचे नुकसान झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती अशा ठिकाणी शहरातील रस्त्यावर वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर घाला अशी मागणी वाढू लागली आहे.
कॅम्प मध्ये दहा वर्षीय विद्यार्थ्यांचा ट्रक मध्ये सापडून बळी गेल्यानंतर शहरांमधल्या अवजड वाहनांची इंट्री आणि ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर मुद्दा चर्चेत आला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाने अवजड वाहनांना बंदीचा आदेश बजावला होता आणि अपघात स्थळी स्पीडब्रेकर घालण्याचे काम सुरू केले होते कॅम्प परिसरात ठराविक वेळेत अवजड वाहनांवर बंदी घातली असली तरी त्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आपण पाहिले आहे यासाठी शहरातील रहदारीचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
बेळगाव शहरातला गजबजलेल्या रस्त्यांपैकी असलेला कॉलेज रोडवर देखील गती रोधकांची संख्या वाढवा अशी मागणी करण्यात येत आहे कॉलेज रोडवर वनिता विद्यालय, लिंगराज आर एल एस कॉलेज याशिवाय महिला विद्यालय अशा अनेक नामांकित शाळा कॉलेज आहेत.
त्यामुळे या भागात विद्यार्थ्यांची वर्दळ अधिक असते याकरिता या रस्त्यावरील गती रोधकांची देखील संख्या वाढली पाहिजे याशिवाय सरदार मैदानही लगतच आहे त्यामुळे अपघातावर नियंत्रण करायचे असल्यास अपघात टाळता येतीलअसे जाणकारांचे मत आहे.
एकूणच कॅम्प सह महात्मा फुले रोड कॉलेज रोड सह शाळा कॉलेज असलेल्या ठिकाणी स्पीड वगैरे घालण्याची गरज व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संख्या शहरात वाढवली पाहिजे तरच अपघातावर नियंत्रण करता येईल