belgaum

बेळगाव लाईव्ह/क्रीडादिनविशेष: विविध खेळांचा समूह म्हणजे ऍथलेटिक्स! धावणे, लांब उडी, उंच उडी, भाला भेक आदी खेळांचा समावेश असलेला खेळ म्हणजे ऍथलेटिक्स!! या खेळासाठी कोणतेही महागडे साधन असण्याची आवश्यकता नसते शिवाय बहुतांशी खेळ हे आपल्या शालेय जीवनातच आपण खेळतो.

आपल्यामधील शारीरिक शक्तीची ओळख पटविण्यासाठी खेळाला जाणारा हा खेळ पदकांची लूट करण्यासाठी असलेला एक हुकुमी क्रीडाप्रकार मानला जातो. स्वातंत्र्यानंतर या खेळात बऱ्याच कालावधीत ऑलिम्पिकमध्ये एकही पद मिळवता न आलेल्या भारतीय खेळाडूंनी हळूहळू भारताच्या पारड्यात सुवर्ण-रौपय-कांस्य पदके घातली. याच उद्देशाने आज बेळगावमधील एक ऍथलिट देखील जोमाने प्रयत्न करत आहे.

तुषार वसंत भेकणे असे या खेळाडूचे नायब आहे.धावणे या प्रकारात सराव करत प्रशिक्षक प्रदीप जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा तुषार भेकणे आजवर अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. गेल्या ८ वर्षांपासून आपले स्वप्न आणि ध्येय मनाशी बाळगून मोठ्या आत्मविश्वासाने तुषार मार्गक्रमण करत आहे.

Athelete tushar bhekne
Belgaum Athelete tushar bhekne

भरतेश शिक्षण संस्थेत बीकॉम प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या तुषारने आतापर्यंत कर्नाटक स्टेट ज्युनियर अँड सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, सार्वजनिक शिक्षण विभाग कर्नाटक, कर्नाटक स्टेट युथ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, कर्नाटक राज्य आंतरराज्य ऍथलेटिक्स, पदवीपूर्व शिक्षण विभाग, स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यासह अनेक संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत आपली उत्तम कामगिरी दाखविली आहे. डेव्हिड रुदिशा या ऍथलेट्सला आपला रोल मॉडेल समजून ऑलिम्पिकची स्वप्ने पाहणाऱ्या तुषारला त्याच्या कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा आणि सहकार्य मिळत आहे.

विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत बेळगावचे नाव उंचावणाऱ्या अनेक अवलियांमध्ये असलेली जिद्द हि बेळगावला मनाची आणि अभिमानाची बाब आहे. बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि बेळगावचे नाव ऑलिम्पिकच्या पाटीवर कोरण्याची जिद्द बाळगून त्याच दिशेने जिद्दीने पुढे जाणाऱ्या तुषार भेकणे याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

*राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!*

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.