Saturday, April 27, 2024

/

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा राम निवास 15 वा ‘मिस्टर इंडिया’

 belgaum

बेळगाव लाईव्ह:इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने पंजाबी हौशी शरीर सौष्ठव संघटनेतर्फे पंजाब येथे आयोजित वरिष्ठ पुरुष आणि महिलांच्या 15 व्या ‘मिस्टर इंडिया’ राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेतील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा सर्वोच्च किताब रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या राम निवास याने हस्तगत केला. महाराष्ट्राचा महेश पाटील उपविजेता ठरला. स्पर्धेचे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद अनुक्रमे रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आणि मणिपूर यांनी पटकाविले.

लुधियाना, पंजाब येथे 16 व 17 मार्च 2024 असे सलग दोन दिवस या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिले पाच विजेते) पुढील प्रमाणे आहे. 55 किलो वजनी गट -के. बाळकृष्ण रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, कुंदन कुमार गोपे झारखंड, दीपेश जनार्दन भोईर महाराष्ट्र, गोपाळकृष्ण राधाकृष्णन तामिळनाडू, सुभासीस सूर पश्चिम बंगाल. 60 किलो गट -नितीन म्हात्रे महाराष्ट्र, एल. निता सिंग मणिपूर, जगेश पिलाजी बैत महाराष्ट्र, वासू रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, भूपेंद्र सिंग पंजाब.Body building

65 किलो गट -विघ्नेश रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, धीरज कुमार कर्नाटक, परिक्षीत हजारीका आसाम, अशोक बेहरा छत्तीसगड, योगेश निकम महाराष्ट्र. 70 किलो गट -पंचाक्षरी भिमान्ना लोणार महाराष्ट्र, प्रतीक पांचाल रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, अमित कुमार भुयान ओडीसा, राजू खान बिहार, महिप कुमार दिल्ली. 75 किलो गट -के. हरीबाबू रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, संतोष गणेश शुक्ला महाराष्ट्र, नम्मी मरूनायडू आंध्र प्रदेश, हॅप्पी पंजाब, राव बिलाल सेंट्रल रेवेन्यू स्पोर्ट्स अँड कल्चरल बोर्ड. 80 किलो गट -व्ही. जयप्रकाश रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, अश्विन शेट्टी ए. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, प्रकाश प्रधान आसाम, सनिथ टी. एस. सर्विस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड,

 belgaum

प्रदीप टी. केरळ. 85 किलो गट -महेश पाटील महाराष्ट्र, एन. सर्बो सिंग रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, विघ्नेश डी. सर्विस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, अजिंक्य रेडेकर महाराष्ट्र, विनोथ कुमार तामिळनाडू. 90 किलो गट -माराडोना क्षेत्रीमयूम मणिपूर, आशुतोष शाह इंडियन पोस्ट, अश्फाक मोहम्मद रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, निलकंठ घोष पश्चिम बंगाल, जयकुमार तामिळनाडू. 90 ते 100 किलो गट -रामनिवास रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, अनुज कुमार तलियान उत्तर प्रदेश, मुरली कुमार आर. सर्विस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, सानिध्य बिस्त उत्तराखंड, प्रशांत कुमार सिंग झारखंड. 100 किलो वरील गट -निलेश दगाडे महाराष्ट्र, सुखदेव सिंग पंजाब, राजकुमार रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, जावेद अली खान रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, मनोज अग्निहोत्री उत्तर प्रदेश. महिला 55 किलो पर्यंतचा गट -हर्षदा संतोष पवार महाराष्ट्र, सविता बनिया आसाम, थोकचोम संजीता मणिपूर, किमया कुमल बेर्डे महाराष्ट्र, शेरबंटी मुजुमदार पश्चिम बंगाल. महिला 55 किलो वरील गट -इंगुडम कविता चानू मणिपूर, वंदना ठाकूर मध्य प्रदेश, बबीता पंजाब, प्रतिभा थापलीयाल उत्तराखंड, अंजू मॅथ्यू केरळ.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन : राम निवास (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), पहिला उपविजेता : महेश पाटील (महाराष्ट्र), दुसरा उपविजेता : माराडोना क्षेती (मणिपूर), सांघिक विजेतेपद पुरुष : रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (425 गुण), पहिले उपविजेतेपद : महाराष्ट्र (310 गुण), दुसरे उपविजेतेपद : मणिपूर (85 गुण). सांघिक विजेतेपद महिला : मणिपूर (75 गुण) सांघिक उपविजेतेपद महिला : महाराष्ट्र (70 गुण), दुसरे उपविजेतेपद : आसाम व मध्य प्रदेश विभागून (प्रत्येकी 25 गुण).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.