गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या खरेदीला सोमवारी अधिकच जोर आला होत. विघ्नहर्ता बाप्पाचे बुधवारी आगमन होणार असल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.रविवारी गर्दीने उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी देखील तसेच चित्र पाहायला मिळाले.दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असल्याने लाडक्या बाप्पाचे जल्लोषत स्वागत करण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळेच बापाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये लगबग दिसून आली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे ठीक ठिकाणी चक्काजाम झाल्याचे दिसून आले.
परिणामी गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाल. उत्सवाचे आहेत अवचित्य साधून दरवर्षी होणारी बाजारपेठेतील गर्दी व्यवस्थापनाला ज्ञात आहे.यामुळे बाजारपेठेत जाण्यासाठी चार चाकी, दुचाकी वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक पोलीस व्यवस्थापन करताना दिसत होते. वाहतुकीला शिस्त असली तरी देखील बाजारपेठांमधून झालेली गर्दी आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी असे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते.
खरेदीसाठीच्या मुख्य बाजारपेठांबरोबरच शहराच्या मध्यवर्ती भागात देखील वाहनांची गर्दी झाली होती.आपली वाहने पार्किंग स्थळी लावून भक्त मंडळी चालत बाजारपेठेतून खरेदी करताना दिसत होते. विविधपूर्ण सजावटीचे साहित्य खरेदी करण्याबरोबरच पाने, फुले, फळे,पूजेचे साहित्य खरेदीसाठी देखील गर्दी करण्यात आली होती. गर्दीतून वाट काढत असताना नागरिकांना नाकीनऊ येत असल्याचे दिसून आले. ठीक ठिकाणी वाहतूक पोलीस आपली ड्युटी बजावताना दिसत होते तरीदेखील ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असे चित्र दिसून आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी संभाजी चौक परिसरात असलेली गर्दी पाहून वाहतूक पोलिस विभागला मदत केली. पोलिस विभागकडून बॅरिकेट लावून सुध्दा नागरिक पालन करत नाहीत. त्यामुळेकार्यकर्ते प्रसाद चौगुले स्वता थांबून नागरिकांना अवाहन केले.येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांधारकांना शिस्त लावली. त्यामुळे रहदारी पोलीसांनी, कॅम्प पोलीस स्टेशन प्रसाद चौगुले यांचे आभार मानले.