Sunday, April 28, 2024

/

इस्कॉन मध्ये जन्माष्टमी उत्साहात संपन्न*

 belgaum

बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
बलराम जयंती म्हणजे 13 ऑगस्ट पासून रोज सायंकाळी इस्कॉन चे अध्यक्ष प पु भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे
कथाकथन झाले. शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता विशेष प्रवचनाने कथा महोत्सवाची सांगता झाली.

श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंधातील 51 व 52 व्या अध्यायाचे महत्त्व प पु भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी कथन केले. जन्माष्टमी निमित्त श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विशेष सजावट करण्यात आली असून भक्तांनी खचाखच भरलेल्या मंदिरात आपल्या प्रवचनाद्वारे “कृष्ण भक्ती हा भगवंतांना जाणण्याचा एकमेव उपाय आहे” असे त्यांनी सांगितले.”

वयाच्या साडे दहाव्या वर्षापासून 28 व्या वर्षापर्यंत भगवंत मथुरेत राहिले आणि त्यानंतर तेथून त्यांनी द्वारकेला प्रयाण केले. या कालावधीत झालेल्या श्री कृष्ण लीला यांचे वर्णन महाराजानी अतिशय सोप्याआणि सरळ भाषेत केल्यामुळे भक्तगण तृप्त झाले.

 belgaum

Iskcon bgm
19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेचार वाजता मंगल आरती, सव्वा पाच ते साडेसात पर्यंत हरिनाम जप, त्यानंतर महाराजांचे विशेष प्रवचन, दिवसभर भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. संध्याकाळी साडेपाच वाजता दीक्षित भक्तांद्वारा अभिषेक, त्यानंतर देणगीदारांचे अभिषेक, नाट्यलीला , महाराजांचे विशेष प्रवचन होऊन रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .हजारो भक्तांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम संपन्न झाले

*शनिवारी व्यासपूजा*

इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा अविर्भाव दिन हा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी येत असल्याने यावर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे . त्यानिमित्त सकाळी दहा पासून विविध कार्यक्रम होणार असून प्रभुपादांच्या जीवनावर अनेक भक्त आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर भक्ति रसामृतस्वामी महाराजांचे प्रवचन आणि सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारच्या कार्यक्रमातही भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.