संजय घोडावत ग्रुपच्या उद्योजकता आणि परिश्रमाचे झळझळीत उदाहरण असलेल्या स्टार लोकल मार्ट या रिटेल शाखेने देशातील आपल्या 84 व्या स्टार लोकलमार्ट या दुकानाचा रामतीर्थनगर बेळगाव येथे नुकताच शुभारंभ केला आहे. घोडावत ग्रुपचे येत्या 2025 पर्यंत देशभरात 3000 स्टार लोकल मार्ट सुरू करण्याचे ध्येय असून बेळगाव येथील दुकान हे त्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.
स्थानिक स्रोत, स्थानिक प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक विक्री केंद्र असलेल्या किराणा मालाच्या या ग्रामीण स्टार्टअपने किरकोळ रिटेल विक्री क्षेत्रात यापूर्वीच आपली लाट निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना अत्युत्तम सेवा आणि सवलतीच्या दरात दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्त्रोतांचे सशक्तीकरण करण्याद्वारे 21 व्या शतकातील रिटेल फ्रेंचायझी मॉडेल बनण्याची आपली कल्पना स्टार लोकलमार्टने प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक व चेअरमन संजय डी. घोडावत यांनी बेळगावातील स्टार लोकलमार्टच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
आम्ही जेंव्हा रोजगाराच्या संधी, स्थानिक कंपन्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी आणि स्थानिक व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक उद्योगाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली त्याचवेळी स्टार लोकलमार्टची संकल्पना आमच्यासमोर उभी होती.
आमचा उत्कर्ष हा संपूर्ण स्टार लोकलमार्ट परिवाराच्या प्रयत्न आणि कल्पकतेचा दाखला आहे. ग्राहकांकडून मिळणारी स्वीकृती आणि प्रतिसाद पाहून मला मोठा आनंद व अभिमान वाटतो, असेही घोडावत म्हणाले.
स्टार लोकलमार्टचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणीक घोडावत यांनी स्टार लोकल मार्टच्या 84 व्या दुकानाचे उद्घाटन हे आमच्या सर्व भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे असे सांगून आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट खरेदीचा अनुभव मिळवून देण्याच्या वचनाची पूर्तता करण्यात आम्ही गेल्या काही वर्षात कमालीचे यशस्वी झालो आहोत असे सांगितले. ग्राहक स्वच्छ तसेच सहज आणि सुविधा पूर्ण खरेदीच्या शोधार्थ असतात ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून आम्ही देशभरातील गावं आणि खेड्यांमध्ये आमच्या पाऊलखुणा सतत विस्तारण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोल्हापूर, पुणे, सांगली, इचलकरंजी, रत्नागिरी, मिरज, बेळगाव, बागलकोट आणि अन्य ठिकाणी सध्या 84 स्टार लोकलमार्ट सुरू आहेत. याद्वारे 25 हजार स्थानिक रोजगाराच्या संधींची निर्मिती करण्यात आली आहे. आता येत्या तीन वर्षाच्या कालावधीत देशभरात 3000 स्टार लोकलमार्ट दुकानं सुरू करण्याचे ध्येय आहे. दर्जेदार मात्र माफक कमी दरातील किराणामाल आणि इतर दैनंदिन घरगुती गरजेच्या वस्तू खरेदी एकाच छता खाली करता येणारे स्टार लोकलमार्ट हे अपवादात्मक अत्यंत योग्य उपयुक्त स्थळ आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.