‘सन्मान प्रगतीचा, गौरव कर्तृत्वाचा’ या राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलनामध्ये बेळगावची नृत्यांगना व सिनेतारका रिया पाटील हिला भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्यामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबई आणि विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यातर्फे कला, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचा सत्कार केला जातो. शहरातील लोकमान्य रंगमंदिर येथे गेल्या मंगळवारी आयोजित ‘सन्मान प्रगतीचा, गौरव कर्तुत्वाचा’ या राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलनामध्ये अखिल भारतीय मानवाधिकार संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिरगांवकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी लेखक निर्माते संदीप राक्षे हे होते.
समारंभास उद्घाटक म्हणून भारत पाकिस्तान शूटिंग बॉल माजी मुख्यमंत्री अशोक दाभोळकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे, नृत्यांगना व सिनेतारका रिया पाटील आणि प्रसिद्ध जादूगार प्रेम आनंद हे उपस्थित होते.
सदर समारंभात रिया पाटील हिला भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी थाबाजी शिंदे, शामरंजनच्या अध्यक्षा स्वाती पवार, विद्यार्थी विकास अकादमीचे अध्यक्ष प्रा. डाॅ. बी. एन. खरात, कृष्णा बामणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.