Sunday, April 28, 2024

/

मराठी कागपत्रांच्या अंमलबजावणीसाठी माजी नगरसेवक आक्रमक

 belgaum

बेळगाव महापालिकेची परिपत्रके व अन्य कागदपत्रे कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी महापालिकेचे प्रशासक व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्वसामान्य जनतेला बेळगाव महापालिकेची कर पावती, नोटीसा, परिपत्रके वगैरे कागदपत्रे कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषेत दिली जावीत. महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्वसाधारण सभांमध्ये तशा आशयाचे ठराव देखील अनेकदा संमत झाले आहेत. पूर्वी महापालिकेची संबंधित कागदपत्रे कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषेत दिली जात होती. मात्र अलीकडे फक्त कन्नड भाषेचा अवलंब केला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ती समजणे कठीण जात आहे. कागदपत्रे मराठी भाषेत देण्याबरोबरच महापालिका हद्दीतील साइन बोर्ड, दिशादर्शक फलक, रस्त्यांचे फलक कन्नड बरोबर मराठी भाषेतही लिहिले जावेत.

 belgaum

बेळगाव नजीक गोवा आणि महाराष्ट्र ही राज्य आहेत आणि तेथील नागरिक खरेदी अथवा काम धंद्यासाठी बेळगावला येत असतात. त्यांच्या दृष्टीने संबंधित फलक मराठी भाषेत असणे सोयीचे ठरणार आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन कन्नडसह मराठी भाषेचा अवलंब केला जावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.Ex corp

निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले की, बेळगाव शहरात 15 टक्के पेक्षा जास्त जवळपास 22 टक्के मराठी भाषिक लोक आहेत. बेळगाव महापालिका स्थापन झाली तेंव्हापासून अलीकडे गेल्या 5 -6 वर्षापर्यंत सर्व कागदपत्रे मराठी भाषेत दिली जात होती. प्रारंभीच्या काळात आम्ही पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळी महापालिकेची विषय पत्रिका उर्दूमधून आली होती, प्रोसिडिंग उर्दूत होते. कारण त्यावेळी बेळगावात 15 टक्क्या पेक्षा जास्त उर्दू भाषिक होते. तेंव्हा आम्ही कन्नड अथवा उर्दू भाषेच्या विरोधात नाही. मात्र मराठी भाषिकांना त्यांचा संविधानात्मक हक्क मिळाला पाहिजे. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेले अधिकार मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे असे सांगून आजतागायत मराठी भाषेचा द्वेष कर्नाटक सरकार इतका कोणीही केलेला नाही. आम्हाला कायम सापत्न भावाची वागणूक देण्यात आली आहे. मात्र यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही ॲड. सातेरी यांनी स्पष्ट केले.

निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमलेल्या माजी नगरसेवकांनी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी जोरदार निदर्शने केली याप्रसंगी माजी महापौर सरिता पाटील,
शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, रतन मासेकर,मोहन बेळगुंदकर,विनायक गुंजटकर,अमर येळ्ळूरकर,गणेश ओऊळकर, गजानन पाटील, रेणू किल्लेकर,राकेश पलंगे,मोहन भांदुर्गे,मनोहर हलगेकर, दिलीप बैलूरकर, माया कडोलकर,सुधा भातकांडे, आदी बरेच माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.