केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट तपासासाठी दिले जाणारे पदक बेळगाव तालुक्याचे सुपुत्र मोदगा गावचे रहिवाशी शंकर मारिहाळ याना जाहीर झाले आहे. कर्नाटकातील सहा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले असून यात शंकर मारिहाळ यांचा समावेश आहे.
एडिशनल एस पी लक्ष्मी गणेश के, डी वाय एस पी वेंकटप्पा नायक,डी आय एस पी मैसूर राजेंद्र गौतम, डी वाया एस पी शंकर गौडा पाटील आणि सर्कल पोलीस इन्स्पेक्टर गुरु बसवराज हिरेगौडर आदींना देखील केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट तपास पदक प्राप्त झाले आहे.
कर्नाटक महाराष्ट्रासह देशातील १५१ तपास अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचा आदेश गृह मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी डी के घोष यांनी बजावला आहे.
शंकर मारिहाळ यांनी यापूर्वी बेळगावातील अनेक पोलीस स्थानकांत निरीक्षक ए सी पी म्हणून सेवा बजावली होती.
सध्या हुबळी हेस्कॉम मध्ये एस पी या पदावर कार्यरत आहेत. शंकर मारिहाळ यांना या अगोदर मुख्यमंत्री पदक देखील मिळाले होते. आता केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट तपास पुरस्कार जायीर झाल्याने त्यांचे कौतूक होत आहे.