Friday, March 29, 2024

/

जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन

 belgaum

पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले.
आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन ‘पत्रकार भवन’ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते. प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले.

लोकमान्य टिळकांच्या फोटोला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आज जे देशात चालले आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडविले जात आहेत. अशांतता निर्माण केल्या जात आहेत. याचे परिणाम मुख्यत्वे सामान्य माणसांनाच भोगावे लागतात आणि म्हणून पत्रकारांनी अशा घटनांना किती प्रसिद्धी द्यावी हे ठरविले पाहिजे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.Marathi patrkar sangh

त्याचबरोबर पत्रकार संघाच्या वाटचालीचा त्यांनी गौरव केला. संस्था इतकी वर्षे चालविणे ही सोपी बाब नाही पण बेळगावच्या पत्रकारांनी ती साध्य करून दाखविले हे कौतुकास्पद आहे. संघाच्या पुढील वाटचालीसही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 belgaum

कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सुहास हुद्दार, विकास कलघटगी, परशराम पालकर,
उपेंद्र बाजीगर, शिवाजी शिंदे, डी. के. पाटील, कृष्णा कांबळे, प्रकाश काकडे, गजानन मुचंडीकर, संजय चौगुले, दीपक सुतार, दिनेश नाईक आदी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.