Friday, May 3, 2024

/

बेळगावच्या विकासावर पालकमंत्र्यांची महत्वपूर्ण चर्चा

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, रेल्वे स्थानक, रेल्वे मार्ग, रस्ते विकास यासह विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विविध मार्गाच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. चोर्ला मार्गाच्या विकासावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, चोर्ला मार्गावर ९ महिने निरंतर पाऊस असतो. यामुळे येथील रस्त्याची सातत्याने दुरवस्था झाल्याच्या तक्रारी पुढे येतात. यामुळे या मरगास्ट काँक्रीटीकरण झाले पाहिजे. या रस्त्याच्या विकासासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली चर्चा झाली असून जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

सांबरा येथील रस्ता सध्या दुपदरी असून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, बेळगाव ते संकेश्वर सहापदरी रस्ता निर्माण व्हावा, असे प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले. यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येत असून या कामाची परवानगीही केंद्रीय प्राधिकरणाकडून दिली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

 belgaum

*जमिनीचे व्यवहार थांबविण्याचे आदेश*
महामार्ग रुंदीकरणासाठी जमिनी संपादित करताना अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे ज्या ज्या ठिकाणी रुंदीकरण हाती घेण्यात येणार आहे, अशा भागातील जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार थांबविण्याचे आदेश प्रत्नधिकाऱ्यांनी दिले आहेत.

*आमदारांनी उपस्थित केला शहरातील रस्त्यांचा मुद्दा!*
यावेळी आमदार बेनके यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. बेळगाव-धारवाड, कोल्हापूर-धारवाड हे मार्ग अत्यंत खराब झाले असून या मार्गांमुळे शहरावर परिणाम होत असल्याचे सांगितले. या मार्गांची डागडुजी अथवा रस्तेविकास व्हावा, याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि यामुळे वाढत असलेले अपघात यामुळे या रस्त्यांच्या विकासाचा मुद्दाही आमदारांनी या बैठकीत उपस्थित केला.Dc office meeting

*आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव*
बेळगाव सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार असून यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले, शिंदोळीसह माविनकट्टीच्या बाजूने आणखी जमीनीचीगरज आहे, यासाठी १०० एकर जमिनीची गरज असून
संचालक राजेश कुमार मौर्य यांनी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या प्रस्ताव एअर पोर्ट ऑथॉरिटी आणि विमान उड्डाण खात्याकडे द्यावा, असे सांगितले. १०० एकर अतिरिक्त जमीन आणि रन-वे वाढ करण्यासाठी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन कारजोळ यांनी दिले.

यावेळी विमानतळ संचालक राजकुमार मौर्य यांनी सांबरा परिसरातील एअर पोर्ट रस्त्यावर कचऱ्यामुळे या भागात वर्दळ करणाऱ्या पक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यात पक्षीं विमानांना धडकण्याच्या दहा हुन अधिक घटना घडल्या आहेत.

या भागांतील घाण कचऱ्याने पक्षांची संख्या वाढली आहे त्यामुळे विमान उतरताना आणि उडताना संभाव्य अपघात होऊ शकतो यासाठी या भागातील स्वच्छता राखण्यासाठी मदत करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने या भागातील ग्राम पंचायतींना स्वच्छते बाबत निर्देश द्यावेत अशी मागणी बैठकीवेळी केली.शिंदोळी गावच्या दिशेने पडलेली भिंत विमानतळ प्राधिकरण बांधेल हा मुद्दा देखील बैठकीत मांडला गेला.बैठकीला राज्यसभा सदस्य इराण कडाडी,खासदार मंगला अंगडी, आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.