लोकशाही बळकटीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना शेतकरी संघटनेने दररोज राष्ट्रगीत व प्रतिज्ञा व्हावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सध्या स्वातंत्र्याचा मूळ उद्देश कमी होत चालला असून रयतांची स्थिती अधिकच कठीण बनली आहे.शेतकऱ्यांना अजूनही स्वातंत्र्य मिळालेले नाही अशी स्थिती आहे.
यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्याबरोबर अखंड भारतासाठी प्रत्येक देश वासियांनी सकाळी आठच्या दरम्यान तीन मिनिट राष्ट्रगीत म्हणून देश प्रेमाची प्रतिज्ञा घ्यावी. या निमित्ताने भ्रष्टाचार कमी होण्याबरोबरच स्वातंत्र्याचा मूळ उद्देश साध्य होईल.
व देशासाठी बलिदान देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण होईल. अमृत महोत्सवानिमित्त संघटनेतर्फे अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदनद्वारे सादर केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.