Friday, January 3, 2025

/

तुकाराम बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

 belgaum

बेळगाव तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या तनामनात आदराचे स्थान निर्माण करुन विश्वासास पात्र असलेल्या श्री तुकाराम को ऑप बँकेची वार्षिक सभा रविवारी बँकेच्या अर्जूनराव दळवी सभागृहात पार पडली.

अध्यक्ष प्रकाश मरगाळे सह उपाध्यक्ष सह सर्व संचालक मंडळ,सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर सभेत वर्षाचा ताळेबंद,नफातोटा व इतर विषयाचे वाचन बँकेचे सहायक तसेच संचालक प्रदिप ओऊळकर यांनी केले.बँकेच्या प्रगतीचा आलेख पहाता सभासदांनी समाधान व्यक्त करत कोरोना काळातही बँकेला झालेला नफा पाहुन सभासदांनी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.त्याचबरोबर इतर विषयावर साधकबाधक चर्चा अत्यंत खेळीमेळीत झाली.

सभासद व इतर सामान्य गरीबांची मुलं शिक्षण घेत असतानां त्यांची वार्षिक फी भरण्यासाठी पालकांची आर्थिक कुचंबना होत असल्याने अनेक पालक आपल्या मुलांची शाळा बंद करतानां दिसल्याने ती बाब ध्यानात घेऊन तशी आर्थिक कुचंबना न होता पालकांना बँकेकडून अत्यल्प व्याजाने पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकानां दहा त पंधरा हजार पर्यंत कर्जपुरवठा करुन बँकेकडून पाठबळ देण्याचा ठराव करण्यात आला.याला सर्वांनी उस्फूर्तपणे सहमती दर्शवत आनंद व्यक्त केला.Agm tukaram bank

त्याचबरोबर आधीपासूनच बँकेतर्फे सभासदांना चष्मा,दातांची कवळी व इतर सुवीधा साठी भरीव मदत दिली जाते.त्याचबरोबर श्री तुकाराम महाराज सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे हुशार विद्यार्थ्यांनाही दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.त्यासाठीच तुकाराम बँक म्हणजे सर्वसामान्यांची बँक म्हणून नावारुपास आली आहे.

आजच्या सभेला अध्यक्ष प्रकाश मरगाळे,उपाध्यक्ष विजय पाटील,संचालक अनंत जांगळे,प्रदिप ओऊळकर,राजेंद्र पवार,राजू मरवे, महादेव सोंगाडी,मदण बामणे,मोहन कंग्राळकर,प्रविण जाधव,संजय बाळेकुंद्री,तज्ञ संचालक सुनिल आनंदाचे,महिला संचालक सौ. वंदना धामणेकर,वकिल सौ. पल्लवी सरनोबत सह बँकेचे सी.ई.ओ.जनरल मॅनेजर परिंद जाधव,मुख्य सहायक संकोच कुंदगोळकर सह सर्व कर्मचारी वर्ग हजर होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.