Friday, April 26, 2024

/

तयारी बाप्पाच्या आगमनाची

 belgaum

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी बेळगाव नगरी सज्ज होताना दिसत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाप्पाच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांपासून कपड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वच दुकाने फुल्ल झाली होती. वर्षानंतर गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे भक्तांच्या मध्ये उत्साह द्विगुणित झाला आहे.

बुधवारी गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. सर्वच दुकानांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक्य साहित्य यांचे जणू प्रदर्शनात भरले होते.विविध साहित्याची रेलचेल भक्तांची लगबग आणि विक्रेत्यांची घाई गडबड असे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळाले.शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मात्र पावसामुळे सायंकाळ नंतर गर्दी पसरल्याचे चित्र दिसून आले होते मात्र रविवारी सकाळपासूनच बाजारपेठा झाल्याचे पाहायला मिळाले.

गणपत गल्ली मारुती गल्ली रामदेव गल्ली पांगुळ गल्ली बुरुड गल्ली खडे बाजार या प्रामुख्याने बाजारपेठाच्या गल्ल्यांमधून चक्का जाम असल्याचे चित्र पहायला मिळाले. चोखंदळपणे बाप्पाच्या सजावटीसाठी विविध साहित्य निवडताना दिसत होते तर विक्रेते आपल्या साहित्यांची जाहिरात करत कशा पद्धतीने साहित्य उपयुक्त ठरेल याची माहिती करून देत होते.यामुळे बाजारपेठात मधून एकच लगबग दिसून आली रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा खुल्या असल्याने घरगुती गणपतीच्या डेकोरेशन बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते देखील बाजारपेठेत विविध साहित्यांची खरेदी करताना दिसत होते.Rush ganesh belgaum market

 belgaum

गणरायाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील आठवडाभरापासूनच बाजारपेठांमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे मात्र आज रविवारचा दिवस असल्याने अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बापाच्या खरेदीसाठी भक्तमंडळी बाजारपेठेत दाखल झाली होती यामुळे आजचा दिवस प्रामुख्याने विक्रेत्या साठी आर्थिक उलाढालीचा ठरला.आपल्या बापाची मनोभावे पूजा करण्याबरोबरच त्याचे दिमाखात स्वागत व्हावे आणि तो आपल्या घरी विराजमान व्हावा यासाठी वैविध्यपूर्णरित्या सजावट करण्यासाठी म्हणून साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती.

लाईटच्या माळा,झिरमुळ्या,थर्माकोलचे साहित्य,थर्माकोलची मंदिरे, पानाफुलांची फुलांच्या माळा,तसेच विविध थीम नुसार तयार करण्यात आलेले डेकोरेशन अशा साहित्याने बाजारपेठा भरल्या होत्या. बापाच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी बेळगांवकर सज्ज होताना दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.