लाच ठरवून ऍडव्हान्स पैसे घेणारे दोघे कर्मचारी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले आहेत.
वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच ठरवून ऍडव्हान्स रक्कम घेतेवेळी अथणी तालुक्यातील बेळगेरी गावचे ग्राम सेवक दोघे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
वारसा सर्टिफिकेट बनवण्यासाठी दहा हजार पाचशे रुपये रक्कम ठरवून तीन हजार रुपये ऍडव्हान्स घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनदमनी आणि ग्राम सेवक प्रहलाद सनदी या दोघांना एसीबी पोलिसांनी रंगे हात पकडून त्यांना अटक केली आहे.
लाच घेणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 19 हजार रुपये रोख रक्कम जप करण्यात आले आहेत.