बेळगाव शहरात पासून अनेक प्रमुख शहरासाठी हवाई सेवा देणाऱ्या स्टार एयर कंपनीच्या ताफ्यामध्ये विमानांची वाढ झाली आहे.
नाॅर्डीक एव्हिएशन कॅपिटल या देशातील पाचव्या सर्वात मोठ्या भाड्याने विमान देणाऱ्या कंपनीने स्टार एअर कंपनीशी दोन एंबरर ई175 विमानांचा भाडेकरार केला आहे.
एंबरर ई175 विमानाची सिंगल क्लास कन्फिग्युरेशनमध्ये आसनक्षमता 78 प्रवासी इतकी असून दुहेरी-श्रेणी कन्फिग्युरेशन 76 आसनांचे आणि हाय डेन्सिटी कन्फिग्युरेशन 88 इतके आहे.
सध्या स्टार एअर कंपनीच्या विमान ताफ्यामध्ये पाच ईआरजे 145 -एंबरर विमाने आहेत. आता आणखी दोन विमानांची त्यात भर पडणार असल्यामुळे या विमानांची एकूण संख्या 7 होणार आहे.
ज्यामुळे स्टार एअरचे पंख हवाई प्रवासाच्या नकाशावर आणखी विस्तारण्यास मदत होणार आहे. सध्या सर्व 17 देशांतर्गत गंतव्यांना स्टार एअरची विमान सेवा सुरू आहे.