Monday, April 29, 2024

/

टिप्परच्या धडकेत 54 बकऱ्यांचा मृत्यू

 belgaum

टिप्पर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्याना चिरडल्याने 54 बकरी गाडीखाली चिरडून दगावल्याची घटना घडली आहे.

हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी इथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली असून अनेक बकरी जखमी झाली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खडी वाहू टिप्पर चालकाच्या निर्लक्षपणा मुळे अम्मनगी मुगळी रस्त्यावर हा अपघात घडला आहे.अपघात होताच टिप्पर चालक फरारी झाला आहे.

 belgaum

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मेंढराना चिरडल्याने मेंढ पाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.हुक्केरी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात टिप्परने मेंढराना चिरडल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.