माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगाव जिल्ह्यातल्या सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातून लढणार का ? याबाबत पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण केपीसीसी चे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे. गोकाक येथे ते माध्यमाशी बोलत होते.
सिद्धरामय्या हे सौंदत्ती मधून विधानसभा निवडणूक लढतील अशी शक्यतावर्तवण्यात आली होती सोशल मीडियावर समाज माध्यमातून तशी बातमी देखील व्हायरल झाली होती त्यावर जारकीहोळी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप पक्षाने गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. सत्तेत असलेल्या पक्षाने समाजामध्ये अशांतत वाढवण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला देखील त्यांनी भाजपला सल्ला दिला.
भाजप नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करण्याऐवजी अगोदर अगदी बारीक पद्धतीने रीतीने विचार करणे गरजेचे आहे काहीही बेताल वक्तव्य केल्यास समाजात अशांती होऊ शकते याचा विचार देखील करणे देखील गरजेचे आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
महाराष्ट्रात आघाडी सरकार पाडण्यासाठी या अगोदर भाजपने दोन वेळा प्रयत्न केला होता मात्र अयशस्वी झाला होता मात्र यावेळेस आमदारांना फोडण्यात भाजप यशस्वी झाली ईडी इन्कम टॅक्स ची धमकी आमदारांना दाखवण्यात आलीअसा आरोप देखील त्यांनी केलाय.शिवसेना फुटली त्यामुळे भाजप सरकार अस्तित्वात आले शिवसेनेत दोन गट पडल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.