विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचे नाव सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा लढवण्या बाबत चर्चेत आल्यापासून या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबतीत सध्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सौंदत्ती मतदारसंघाबाबत मोठे विधान केले आहे. सौंदत्ती विधानसभा मतदारसंघात ‘सर्वप्रथम स्थानिकाला प्राधान्य देण्यात येईल जर स्थानिकांमध्ये एकमत होत नसेल तर तो विषय हाय कमांडला कळविण्यात येईल’ आणि त्यानंतर या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबतीत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.
सोमवारी सकाळी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासोबत हुदली येथील बळळारी नाला डॅमच्या समस्येबाबत शेतकऱ्यांची समस्या घेऊन अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केलंय.
सतीश जारकीहोळी तुम्ही सौन्दत्ती मधून प्रयत्नशील आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की सौंदत्ती विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही काँग्रेससाठी ग्राउंड तयार करत आहोत पहिला काँग्रेस निवडून येणे हा आमचा उद्देश असेल त्यानंतर मग कुणाला उमेदवारी द्यायचा ते निश्चित करू. आगामी जानेवारीनंतरच याबाबत मी स्पष्ट सांगू शकेन जानेवारीपर्यंत आम्ही सौंदत्तीत ग्राउंड तयार करत आहोत आणि जानेवारीनंतरच आम्ही कुठे थांबणार किंवा कुणाला उमेदवारी मिळणार हे सांगू शकेन असे यावेळी त्यांनी सांगितले.
दावणगिरी हुबळी इथं काँग्रेसच्या मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत आणि केपीसीसीच्या बैठकीमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसचा काँग्रेसला बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कर्नाटकात सभा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आमंत्रण देण्यात देण्यात आलेला आहे आणि लवकरच राहुल गांधी हे कर्नाटक दौरा करणारा असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.सर्वच पक्षात पक्ष आणि व्यक्ती निष्ठा महत्त्वाच्या असतात हे केवळ काँग्रेस नव्हे तर जनता दल आणि भाजपात देखील आहे असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
हुदली येथील बेळळारी नाला डॅम संदर्भात अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष झाले होते त्या समस्या सोडवण्यासाठी डी सी नितेश पाटील यांच्या सोबत शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे असेही त्यांनी सांगितलं.