Sunday, December 29, 2024

/

इंग्लंड मधील आयर्न मॅन शर्यतीत ‘यांचे’ सुयश

 belgaum

आयर्न मॅन ही शर्यत मनुष्याच्या सहनशक्तीला आव्हान देणारी जगातील अत्यंत अवघड शर्यत म्हणून ओळखली जाते आणि बेळगावच्या संतोष शानबाग यांनी बोल्टन, इंग्लंड येथील ‘आयर्न मॅन युके’ या शर्यतीत भाग घेऊन ती 14:04:39 इतक्या वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

जलतरण 3.8 कि. मी., सायकलिंग 180.2 कि. मी. आणि धावणे 42.2 कि. मी. असे बोल्टन येथील आयर्न मॅन शर्यतीचे स्वरूप होते. संतोष शानबाग यांनी यापद्धतीने दुसऱ्यांदा आयर्न मॅन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यापूर्वी संतोष यांनी 2017 मध्ये लंगकावी मलेशिया आयर्न मॅन शर्यत 16 तास 29 मिनिटात पूर्ण केली होती.

आयर्न मॅन श्रीलंका शर्यतीमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. गोव्यामधील 2019 च्या आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेणाऱ्या संतोष यांनी 2018 मध्ये आयर्न मॅन श्रीलंका शर्यतीत भाग घेतला होता. आयर्न मॅन 70.3 शर्यत म्हणजे ‘हाफ -आयर्न मॅन’ जिच्यामध्ये 1.9 कि. मी. जलतरण, 90 कि. मी. सायकलिंग आणि 21.1 कि. मी. धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो.

आपल्या यशासंदर्भात बोलताना संतोष शानबाग यांनी इंग्लंड मधील आयर्न मॅन शर्यत अतिशय कठीण होती परंतु मी ज्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली ती वेळ पाहता मागील 2017 मधील कामगिरी पेक्षा यावेळी माझी कामगिरी सुधारली आहे जे माझ्यासाठी उत्साहवर्धक आहे, असे सांगितले. संतोष शानबाग हे हॉटेल व्यवसायिक असून बेळगावातील वेणूग्राम सायकलिंग क्लबचे अध्यक्ष आहेत.Iron man

गोल्डन इंग्लंड येथील आयर्न मॅन शर्यतीमध्ये जगभरातील 51 देशांमधील 18 ते 74 वर्षे वयोगटातील 2300 ॲथलेट्सचा सहभाग होता. बहुतांश आयर्न मॅन शर्यती पूर्ण करण्यासाठी निर्धारित 17 तासाचा अवधी दिला जातो.

या कालावधीत जो क्रीडापटू शर्यत पूर्ण करतो त्याला ‘आयर्न मॅन’ हे विशेष नांव मिळते. संतोष शानबाग यांनी मात्र 14.04 तासातच इंग्लंड येथील शर्यत पूर्ण केली आहे. सदर आंतरराष्ट्रीय यशाबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.