अवैधरित्या गांधीनगर येथून कोल्हापूरकडे विक्रीसाठी नेण्यात येणारा तांदूळ पोलिसांकडून जप्त-गरजू गरीब लोकांसाठी शासनातर्फे तांदूळचे वितरण करून अन्न ही गरज भागवणे भागवली.मात्र सदर व्यवस्था अचूक व्यक्तीला मिळणे तर दूरच उलट अवैधरित्या त्याची विक्री करण्याचा प्रकार अनेक वेळा उघडकीस आला आहे.
असाच प्रकार राष्ट्रीय महामार्ग हिरण्यकेशी साखर कारखान्याजवळ घडला आहे. या प्रकारात बेळगावचे कनेक्शन असून बेळगावातील गांधीनगर येथूनच कोल्हापूरकडे अवैधरीत्या रेशनचा तांदूळ विक्रीसाठी नेण्यात येत होता.
कोल्हापूरकडे जाणारा हा ट्रक पकडण्यात आला असून. या वेळी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा 12 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. संकेश्वर (ता. हुक्केरी) पोलिसांनी ही कारवाई केली आहे यासंदर्भात शांतिनाथ पाटील (बसवन कुडची, बेळगाव) याच्यावर संकेश्वर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
ट्रकमधील 12 क्विंटल तांदूळ व वाहन ताब्यात घेतले आहे.ट्रकमालक चालक रमेश नारायण मनवडर (रा. वड्डर गल्ली, संकेश्वर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. येथील पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगेरी व पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी यांनी सहकार्यांनिशी सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला आहे.
अवैधरित्या होणारी तांदळाच्या विक्रीची ही घटना पाहून गरजू गरीब लोकांना अन्न मिळावे या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या रेशन वितरणाचा हा काळाबाजार आणि यामुळे होणारे नुकसान यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.