Monday, April 29, 2024

/

ऊसात पिकविलेला 9.95 लाखाचा 95 किलो गांजा जप्त

 belgaum

गोकाक नजीकच्या होनकुप्पी येथे उसाच्या मळ्यामध्ये पिकवण्यात आलेली सुमारे 10 लाख किमतीची 95 किलो गांजाची झाडे कुलगोड पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेण्यात आले आहे.

बसप्पा रंगप्पा लगळी आणि सिद्धाप्पा बसप्पा लगळी अशी अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. लगळी कुटुंबाने आपल्या शेतातील ऊसाच्या मळ्यामध्ये गांजाची लागवड केली होती.

याबाबतची माहिती मिळताच काल शुक्रवारी पहाटे कुलगोड पोलिसांनी छापा टाकून होनकुप्पी येथे उसाच्या पिकामध्ये पिकविलेला सुमारे 95 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला.Ganja

 belgaum

बाजारपेठेत या गांजाची किंमत 9 लाख 95 हजार रुपये इतकी होते. सदर प्रकरणी लगळी बापलेकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.