मोबाईल टॉर्च च्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार या मथळ्याखाली ‘बेळगाव Live’ ने अनगोळ, चिदंबर नगर येथील स्मशानभूमीची दुरावस्था सादर केली होती. स्मार्ट सिटी असणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेकडून सुविधांना हरताळ फासला जात असून याकडे देण्यात यावे असे नमूद करण्यात आले होते.
या बातमीची दखल घेत श्रीराम सेना हिंदुस्थानचे दक्षिण अध्यक्ष राजेंद्र बैलूर आणि कौशिक पाटील तसेच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी घेतली आणि या समस्येचा पाठपुरावा करत महानगरपालिकेकडून तात्काळ स्मशानभूमीची पाहणी करून येथील विद्युत व्यवस्था दुरुस्त करावी अशी मागणी केली. तात्काळ याचा पाठपुरावा करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बातमीच्या 24 तासाच्या आत दुरुस्ती करून घेण्यात आली.
चिदंबरनगर स्मशानभूमीत लाईट नसल्यामुळे मृतदेहांची हेळसांड होऊन तिथल्या नागरिकांना मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंतिम संस्कार उकरावे लागत होते.स्मार्ट सिटी बेळगाव असलेल्या महापालिका कार्यक्षेत्रात अशी वेळ आली असल्याने स्मार्ट सिटीचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता दुरुस्ती झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सगळ्या घटना क्रमांकावर बघताना एक गोष्ट लक्षात येते की अनेक नागरिकांना सुविधा पुरवताना महानगरपालिका कमी पडत आहे. योग्य सुविधासाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. निधी असून देखील व्यवस्था पुरवण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. अचूक सुविधासाठी नागरिकानी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी चार वर्षांपूर्वी याच स्मशानभूमीत आंदोलन करत स्मशान शेड दुरुस्ती करवून घेतले होते लोकप्रतिनिधनी मनपाला सतत पाठपुरावा केल्याशिवाय कामे होत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे.
अशी आहे रविवारी रात्रीची बातमी
*बेळगावात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने करावा लागतोय अंतिम संस्कार….*