Friday, December 27, 2024

/

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण सोहळा उत्साहात

 belgaum

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा शालिनी अनिल चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर यांच्यासह अन्य नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

आदर्शनगर हिंदवाडी येथील आयएमईआर ऑडिटोरियममध्ये गेल्या शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यात्मिक गुरु उषा हेगडे तर सन्माननीय अतिथी म्हणून इनरव्हील असोसिएशन सेक्रेटरी रत्ना बेहरे उपस्थित होते.

या समारंभात इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव 2022 -23 सातच्या नूतन अध्यक्षा शालिनी पाटील, सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर, उपाध्यक्ष मंजिरी पाटील खजिनदार शिल्पा शहा, आयएसओ मेधाशहा आणि संपादक बेला शिवलकर यांच्यासह कार्यकारी समितीच्या अन्य 12 सदस्यांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले.Inner wheel

नूतन अध्यक्षासह अन्य पदाधिकारी व कार्यकारी समितीच्या सदस्यांना इन्स्टॉलेशन ऑफिसर माजी अध्यक्षा रूपा देशपांडे यांनी अधिकार पदाची शपथ देवविली. नूतन अध्यक्ष शालिनी चौगुले यांनी यावेळी मावळते अध्यक्षांकडून या अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांसह नूतन अध्यक्ष व इतरांची समयोचित भाषणे झाली. अधिकारग्रहण समारंभास इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य सदस्य आणि निमंत्रित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.