बेळगावातील व्हाय नॉट क्रिएशन्स या युवकांच्या समूहाने माहेश्वरी अंधशाळेतील मुलांच्या जीवनाची गाथा उलगडणारा ‘दृष्टी’ हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटातून डोळस व्यक्तींनी अंधांच्या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंचितसा बदलावा हीच अपेक्षा आहे. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील दृष्टीही बालकांच्या आयुष्यावर चित्रित हा माहितीपट नागरिकांनी युट्युबच्या माध्यमातून जरूर पहावा, असे आवाहन व्हाय नॉट क्रिएशनने केले आहे.
या माहितीपटाची निर्मिती प्रणाम राणे यांनी केली असून अक्षय गोडसे यांनी दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून स्वप्निल नावगेकर यांच्यासह उमेश पवार, रोहित चौगुले, अरबाज किल्लेदार, अभिषेक गवी, निखिल काळे, अजिंक्य कुडतरकर, अभिजीत देशपांडे, प्रिया काळे, प्राजक्ता बेडेकर, प्रसाद देऊरकर, प्राजक्ता शहापूरकर व शिरीष कुलकर्णी यांचा या माहितीपटाच्या निर्मितीत सहभाग आहे.
या माहितीपटाला आणि व्हाय नॉट क्रिएशन या युवकांच्या समूहाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दृष्टी या माहितीपटाचा निर्माते प्रणाम राणे यांनी गेल्या 27 जून रोजी युट्युबवर प्रदर्शित झालेल्या ‘दृष्टी’ या 18 मिनिटाच्या माहितीपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे सांगितले. अवघ्या सहा दिवसात सुमारे 9000 हून अधिक जणांनी हा माहितीपट पाहिला. तसेच या अवधित व्हाय नॉट क्रिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला 500 हून अधिक सबस्क्राईबवर लाभले असल्याची माहिती दिली.
इतके भरभरून प्रेम मिळाल्याबद्दल व्हाय नॉट क्रिएशनच्या सर्व सदस्यांनी समस्त प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे जर कोणी दृष्टी हा माहितीपट पाहिलेला नसेल त्यांनी लिंकद्वारे किंवा क्यूआर कोडद्वारे अथवा यूट्यूबच्या सर्च बारवर ‘दृष्टी’ असेल टाईप करून हा माहितीपट अवश्य पहावा, असे आवाहनही केले आहे.