बेळगाव लाईव्ह ने आजपर्यंत जनतेचे व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत असतानाच समाजात घडणाऱ्या सकारात्मक बाबी देखील जनते समोर आणून समाजमन घडवण्याचे मोलाचे कार्य बेळगाव लाईव्ह करत आहे.
रस्त्यात हजारो रुपये किमतीची बी बियाणे सापडलेली बातमी बेळगाव लाईव्ह ने जनते समोर आणली नंतर ती बातमी वाचून बी बियाणे ज्यांची वाहनावरून जाताना पडली होती त्या व्यक्तीने बेळगाव लाईव्ह शी संपर्क साधला.त्यामुळे ज्या व्यक्तीला बी बियाणे मिळाली होती त्याच्याशी संपर्क साधून ती बी बियाणे संबंधित व्यक्तीला परत करण्यात आली.हे झाले एक उदाहरण बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट चे.दुसरे उदाहरण आहे दीड लाख रुपये किमतीचे हरवलेले गंठण संबंधित महिलेला परत केल्याचे.सध्या सकारात्मक घटना कमी पाहायला आणि अनुभवायला मिळतात.पण अशा काही मोजक्या सकारात्मक घटना घडतात त्या समाजाच्या समोर मांडण्याचे कार्य बेळगाव लाईव्ह करत आहे.
रस्त्यावर सापडलेली 30 हजार रुपये किंमतीची बि-बियाने औषधे मूळ मालकाला परत करत काँग्रेस रोड येथे राहणाऱ्या युवकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे तर ही हरवलेली वस्तू परत मिळवण्यात बेळगाव live ने पुन्हा एकदा उपयुक्त माध्यमाची भूमिका बजावली आहे.
काँग्रेस रोड येथे रहाणाऱ्या विनायक पाटील नावाच्या युवकाला गुरुवारी सायंकाळी रस्त्यावर पडलेली महागडी बियाणे आणि औषधें सापडली होती. कोणत्या तरी गरीब शेतकऱ्याची शेतात मारण्याची औषध समजून विनायक पाटील यांने बेळगाव Live ला संपर्क करत सदर बियाणे सापडली असल्याची बातमी दिली ती बातमी शनिवारी सकाळी बेळगाव live वर प्रसिद्ध करण्यात आली
मजगाव येथील सागर सातेरी हे बियाणे आणि औषधे घरी घेऊन जात असतेवेळी काँग्रेस रोडवर पडली होती ती विनायक पाटील यांना सापडलीत्यांनी बेळगाव live च्या माध्यमातून त्यांना परत सुखरूप सुपुर्त केली.
रस्त्यावर पडलेली तब्बल 30 हजार रुपयांची बीयाणे प्रामाणिकपणे परत करत विनायक याने प्रामाणिकपणा दाखवला आहे त्यामुळे सागर यांनी विनायक पाटील यांचे आभार मानले आहेत. परत बी याने औषधें सुपुर्त करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक पावशे,बेळगाव liveचे संपादक प्रकाश बेळगोजी उपस्थित होते.यावेळी सागर सातेरी यांनी विनायक पाटील यांचे आभार मानले.
दोन दिवसांपूर्वी जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे हलगा येथील महिलेचे सोन्याचे गंठन एकता युवक मंडळच्या कार्यकर्त्यांना सापडले होते ते देखील परत मिळवून देण्यात बेळगाव liveने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.हरवलेल्या वस्तू मूळ मालकांपर्यंत पोचवण्यासाठी माध्यम म्हणून बेळगाव live सोशल मीडियावरील वृत्त वाहिनी महत्वाची भूमिका निभावत आहे.बेळगाव live वरील बेळगावातील सामान्य माणसांचा विश्वास दिवसेंदिवस वाढतच आहे.