सरकारी कार्यालयांमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यावर बंदी घालण्याचा आपला आदेश राज्य सरकारने 24 तास पूर्ण होण्याआधीच काल रातोरात मागे घेतला आहे.
सरकारी कार्यालयामध्ये कामकाज सुरू असताना फोटो किंवा व्हिडिओ काढण्यावर काल शुक्रवारी राज्य सरकारने एका आदेशाद्वारे बंदी घातली होती.
सार्वजनिकांकडून सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष करून महिला कर्मचाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले जातात.
या फोटो आणि व्हिडिओंचा सोशल मीडियावर गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष करून महिलावर्गाला त्रास दिला जातो, त्यांची प्रतिष्ठा डागाळली जाते. हे कारण देऊन सरकारने सरकारी कार्यालयामध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यावर बंदी आदेश जारी केला होता.
सरकारकडून काल हा आदेश जारी होताच राज्यभरातून त्याला तीव्र व्यापक विरोध करण्यात आला. परिणामी 24 तास उलटण्याआधीच काल रातोरात सरकारने आपला हा आदेश मागे घेतला आहे.