Friday, September 13, 2024

/

किश्तवाड येथे सर्वात उंच ध्वजस्तंभ झाला लोकार्पण

 belgaum

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड़ शहराच्या कुलीद चौकामधे सर्वाधिक उंचीचा 100 फुट उंच ध्वजस्तंभ लोकार्पण करण्याचा शानदार सोहळा आज शनिवारी सकाळी पार पडला. सीआयएफ (डेल्टा)चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अजय कुमार यांच्या हस्ते या ध्वजस्तंभावरील राष्ट्रध्वज फडकावून तो किश्तवाड़ येथील स्थानिक लोकांना समर्पित करण्यात आला. यामुळे किश्तवाड जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल.

या सोहळ्याप्रसंगी ब्रिगेडियर प्रणब मिश्रा, 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इनफन्ट्री)चे कमान अधिकारी कर्नल अमेय चिपळुनकर, किश्तवाडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार, एसएसपी शफकत हुसैन, पूजा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सीआयएफ (डेल्टा) फ़ोर्स कमांडर मेजर जनरल अजय कुमार यांनी किश्तवाड़ शहीद स्मारकचे देखील उद्घाटन केले. हा शहीद स्मारक किश्तवाड़ जिल्ह्यात आतंकवादी लढ्यात शहीद झालेल्या वीर जवानांना समर्पित आहे.

किश्तवाड़ प्रमाणे 100 फुट उंचीचे ध्वजस्तंभ जम्मू-कश्मीरमध्ये फक्त 4-5 जिल्ह्यात आहेत. हा राष्ट्रध्वजाचा स्तंभ उभारण्यात 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इनफन्ट्री)चा सिंहाचा वाटा आहे. कर्नल अमेय चिपळुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कठिण परिस्थिती असतानाही मराठा जवानांनी हिंमतीने आणि जोशाने अगदी कमी वेळात ध्वजस्तंभ उभारण्याचे काम पूर्ण केले.

Kishtwar flag
सदर ध्वजस्तंभ उभारण्यासाठी किश्तवाड जिल्हाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी जलदगतीने सर्व मंजूरी व परवानगी मिळून दिल्याबदल सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची प्रशंसा केली.

यासोबत या प्रकल्पाचे सर्व देणगीदार कप्तान तुषार महाजन फाउंडेशन, मेजर अक्षय गिरीष ट्रस्ट, लोकमान्य ट्रस्ट बेळगाव, मंगलदास ट्रस्ट मुंबई व किश्तवाड़ मधील हायड्रो पाॅवर कंपनीज यांचेही आभार मानण्यात आले.

ध्वजवंदना सोहळयानंतर 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इनफन्ट्री)च्या जवानांच्या झांझ पथकाने धडाकेबाज प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मराठी संस्कृतीची झलक दाखवली. ध्वजस्तंभाच्या उभारणीबद्दल सर्व समुदायाच्या लोकांमध्ये 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इनफन्ट्री) ची प्रशंसा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.