पुढील वर्षी बेळगाव विमानतळावरून दर महा 50 हजार प्रवाश्यांची ये जा व्हावी ‘हे’ स्वप्न आम्ही पाहतोय. उडान योजनेमुळेचं बेळगावला इतकं यश मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षात बेळगाव विमानतळाच्या विकासावर जनता देखील समाधानी आहे. आगामी काळात देशातील इतर नव्या शहरांना बेळगावशी जोडण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील.
जनतेला विमानतळाचा फायदा व्हावा पर्यटन वाढेल नोकऱ्या वाढतील उद्योगधंदे वाढतील. एअर पोर्ट विकसित झाले तर उद्योगधंद्यांना चालना मिळते हे सिद्ध झाले आहे यासाठीचं प्रयत्न असतील अशी ग्वाही बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिली.बेळगाव विमानतळ विमान उड्डान खात्याच्या अग्रीकल्चर उडान योजनेत सामील झाले आहे त्या पाश्वभूमीवर ही योजने बाबत बेळगाव Live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी घेतलेल्या खास मुलाखातीत ते बोलत होते.
बेळगावचा विभाग हा एग्रीकल्चर बेल्ट (कृषी पट्टा)असल्याने या भागात होणाऱ्या भाजीपाला पिकं उत्पादने फळ फळांना देशातील वेगवेगळ्या ठिकाणी त्वरित पाठवण्यासाठी बेळगाव विमानतळ अग्रिकल्चर उडान योजनेमध्ये सामील करण्यात आले आहे.यामुळे कृषी उत्पादनाना एक प्रकारे प्रोत्साहन मिळेल असा दावा देखील मौर्य यांनी केला.
ते म्हणाले की कृषी उडाणचा हा दुसरा टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये बेळगावला सहभागी करण्यात आलेला आहे 2021- 22 मध्ये पहिला टप्प्यांमध्ये देशातली 53 विमानतळ कृषी उडान मध्ये सहभागी करण्यात आली होती विमान उड्डाण खात्याच्या वतीने देशातील 53 विमानतळांना जिथे कृषी उत्पादना अधिक आहेत कृषी उत्पादनाना दूरदूर पाठवायची गरज आहे, एअर कार्गोच्या माध्यमातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती.
एअर कार्गो मधून उत्पादन लवकर पोहोचावे यासाठी लोक याचा वापर करत असतात बेळगाव विमानतळावर कार्गोसाठी मूलभूत सुविधा आहेत. स्पाइस जेट आणि इंडिगोच्या माध्यमातून हे काम या आधीच सुरू आहे मात्र आता कृषी उडाण आल्यानंतर जवळपास सगळ्याच उडाणामधून बेळगाव परिसरातलं शेतीमाल फळे फुले इतर उत्पादने देशातल्या कोणत्याही भागात त्वरित गतीने पाठवण्यास मदत होणार आहे. एकदा याची सुरुवात होऊन मागणी वाढल्यास विशेष कार्गो सुविधा आणि वेगळे कार्गो टर्मिनल बनवण्याचा प्लॅन आहे असेही मौर्य यांनी यावेळी सांगितले.
बेळगाव शहरांशी जोडणाऱ्या देशातील मोठमोठ्या 12 शहरांना अग्रीकल्चर उडान अंतर्गत कृषी किंवा इतर उत्पादने पाठवू शकतो कार्गो पाठवण्यासाठी बेळगाव विमानतळावर छोटासा सेटअप बनवण्यात आला आहे त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये बेळगाव विमानतळावरून विविध प्रकारचे उत्पादन विविध असे मिळून 26 मेट्रिक टन कार्गो आम्ही बेळगाव मधून बाहेर पाठवलं आहे.दिल्ली स्पाइस जेट 737 ए टी आर मध्ये 1 टन तर लहान विमानातून 400 किलो कार्गो दररोज आम्ही पाठवू शकतो असे त्यांनी सांगितले.
पुढील आठवड्यापासून या योजनेवर आम्ही सक्रिय पणे काम करणार असून जिल्हाधिकारी चेंबर कॉमर्स, शेतकरी आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्याशी चर्चा करून जनसंपर्क करणार आहोत व जनजागृती करून ही योजना कशी अमलात आणली जाईल यावर काम करणार असल्याचे स्पष्ट केलं