चमत्कारी निसर्गाचा प्रत्यंतर आपल्याला वेळोवेळी येत असतो आणि बरेचदा हा चमत्कार थक्क करणारा असतो. असा चमत्कार शहरातील एका पांढऱ्या जास्वंदीच्या फुल झाडाच्या बाबतीत घडला असून या झाडाला चक्क पांढरे व गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे.
हा चमत्कार बेळगावातील ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक आणि डॉ. प्रणव अध्यापक यांच्या निवासस्थानी घडला आहे. अध्यापकांच्या शहापूर आचार्य गल्लीतील निवासस्थानी असलेल्या पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडावर चक्क गुलाबी रंगाचे फूल उमलले आहे. विशेष म्हणजे पांढऱ्या आणि गुलाबी जास्वंदीचे फूल आजूबाजूला उमलले आहेत.
आचार्य गल्लीतील डॉ. प्रणव अध्यापक यांच्या घरासमोरील अंगणात लावलेल्या जास्वंदीच्या झाडावर आज गुरुवारी सकाळी निसर्गाचा हा चमत्कार पाहायला मिळाला.
जास्वंदीच्या एकाच झाडाला उमललेले पांढरे आणि गुलाबी रंगाचे फुल प्रथम गल्लीतून ये-जा करणार्या नागरिकांच्या निदर्शनास आले.
त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करत त्याबाबतची माहिती अध्यापक यांना दिली. दरम्यान पांढऱ्या जास्वंदीच्या झाडाला गुलाबी फुल उमलण्याचा निसर्गाचा हा चमत्कार शहापूर आचार्य गल्ली परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.