बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साने गुरुजी यांना यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी महापौर गोविंद राऊत यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.
त्याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष नेताजीराव जाधव उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर कार्यवाह रघुनात बांडगी, सहकार्यवाह सौ लता पाटील आणि प्रा. डॉक्टर विनोद गायकवाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. गायकवाड म्हणाले सानेगुरुजी हे थोर द्रष्टे देशभक्त होते त्यांनी समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन दीनदलितांना व्हावे यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले व त्यामुळेच सर्वांना देवदर्शन घडू लागले एका अर्थाने देवाच्या दरबारातील विषमता त्यांनी नष्ट केली.
त्यांचे साहित्य योगदानही खूप मोलाचे आहे त्यांच्या कथा कादंबर्या वैचारिक पुस्तके सर्वच संस्कारशील आहेत भारतीय सलसाहित्यात त्यांचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक अढळस्थानी आहे या पुस्तकाने अनेक पिढ्या संस्कारित केल्या.
कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले तर नेताजी जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन सौ सुनिता मोहिते आणि केले यावेळी वाचनालयाचे संचालक अभय याळगी,अनंत जांगळे, वकील अमर येळळुरकर प्रताप पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.