belgaum

कर्नाटक राज्यातील महापालिकांमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, त्यांना किमान वेतनाबरोबरच सरकारी सुविधाही द्याव्यात, या मागणीसाठी येत्या 1 जुलैपासून काम बंद आंदोलन छेडून संपावर जाण्याचा निर्णय सफाई कामगार संघटनेच्या विभागीयस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.

bg

हुबळी येथे सफाई कामगार संघटनेची विभागीय स्तरीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस सफाई कामगार संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, मानद अध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, सरचिटणीस विजय निगरगट्टी, कोषाध्यक्ष षण्मुख आदिअंद्र आदी उपस्थित होते.

राज्यात सुमारे 4 हजार सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना कायम करण्याचा निर्णय 2017 -18 मधील तत्कालीन सरकारने घेतला होता. तथापि आजतागायत त्या सफाई कामगारांना कायम करण्यात आलेले नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कामगारांनाही निर्धारित मासिक वेतन, घरे, रजा वैद्यकीय सुविधा, महिला सफाई कामगारांना प्रसूती काळातील रजा अशा सुविधा देण्यात याव्यात. बेळगाव महापालिकेत 551 कंत्राटी व 548 इतर सफाई कामगार काम करीत असून यापैकी 138 कामगार कायमस्वरूपी आहेत. अलीकडे तीन महिन्यापूर्वी 155 सफाई कामगारांना कायम करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

सफाई कामगारांना पैकी 253 जणांना घरे वाटप करण्यात आली असली तरी त्यांना कब्जा देण्यात आलेला नाही, 383 सफाई कामगारांना ओळखपत्र मिळालेले नाही अशा तक्रारी विभागीयस्तरीय बैठकीत मांडण्यात आल्या. तसेच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 1 जुलैपासून सफाई कामगारांनी काम बंद ठेवावे. त्याचप्रमाणे 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.