Sunday, April 28, 2024

/

पाऊस ओला अंगणी आला…

 belgaum

दबक्या पावलाने दोन-तीन दिवसात येणारा तुरळक तुरळक सरिनी येणारा पाऊस,आज शुक्रवारी दमदार पावले टाकत बेळगावात हजर झाला आहे. सहा जूनला येणारा हा पाहुणा आज 24 तारखेला नेहमीच्या रूपात हजर झाला आहे. लोकांनी त्याचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे,परंतु दरवर्षी वेळेवर येणारा पाऊस आज 15 ते 20 दिवस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांची गणितं चुकली आहेत. काहीनी पेरण्या लांबणीवर टाकल्या होत्या तर काहींनी धुळवाफ पेरणी केल्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभं आहे. पावसाचा सध्याचा मोसम बघता हंगाम कसा जातो याबद्दल शेतकरी साशंक आहेत

यावेळी मृग नक्षत्राचे वाहन गाढव असल्याने पाऊस तसा कमीच असण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकरी पेरणी च्या बाबतीत अजून नक्की मतावर आलेला नाही. एकंदर हवामान खात्याने 102% जरी पावसाची खात्री दिली असली तरी पाऊस सरासरी कसा गाठणार याविषयी शेतकऱ्यांत संभ्रमावस्था आहे. जर पावसाने मागील बॅकलाग भरून काढला तर जबरदस्त पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर अनेक घरांची झाडांची पडझड होणे, झाडे पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पावसाळी अपघातांची शक्यता आहे. यावर्षीचा पाऊस रमणीय होणार की दमवणूक करणारा होणार या विषयी लोकांच्यात एक मतमतांतरे आहेत.

बल्लारी नाल्याजवळ चर काढणे, कॅनल काढणे, ड्रेनेज पाईप काढणे आधी, कामे झालेली आहेत त्यामुळे यावर्षी यरमाळरोड , येळळूर शिवार, शहापूरशिवार येथील शेती परिसरात पाणी भरण्याची शक्यता काही प्रमाणात कमी झाली आहे.School children

 belgaum

कोविड मुळे दोन वर्ष उसंत घेतल्यानंतर सुरु झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची मात्र या पावसामुळे तारांबळ उडणार आहे. शुक्रवारी सकाळी त्याची झलक पाहायला मिळाली शाळेला जाणाऱ्या मुलांनी छत्र्या रेनकोट जॅकेट स्वेटर आधी परिधान करून शाळेकडे प्रस्थान केले. छत्री, रेनकोट, पावसाळी बूट आदींची बेळगावच्या बाजारात रेलचेल आहे.अर्थ व्यवस्था परत एकदा पावसाने गतिमान होईल अशी आशा लोकांच्यातून व्यक्त होत आहे.

पाऊस हा सृजनशील असतो, माणसाच्या जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे त्यामुळे माणूस पावसाच्या अनेक रुपाकडे सकारात्मकपणे पाहतो.आता वर्षा सहली निघतील.नदी.नाले ओढे भरून वाहतील, परत एकदा हिरवाकंच निसर्ग भरून येईल. सणासुदीचे दिवस येतील आणि उल्हासित मानवी जीवन परत एकदा चालू होईल. हीच या पावसाकडून अपेक्षा आहे. एकूणच पावसाचं आगमन झाल्याने वातावरण सगळीकडे आनंदी झालेलं आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.