Thursday, April 25, 2024

/

प्रकाश हुक्केरी म्हणजे शिक्षकांना मिळालेला अनुभवी आमदार

 belgaum

विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आज बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी अखेर विजय संपादन केला आहे. भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांना त्यांनी धुळ चारल्यामुळे आता शिक्षकांच्या समस्या मांडणारा नवा लोकप्रतिनिधी अर्थात आमदार बेळगावच्या शिक्षकांना मिळाला आहे.

20 हजार मतांपैकी 10520 मते मिळवत प्रकाश हुक्केरी यांनी 4512 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे भाजपच्या अरुण शहापूर यांना 6008 मते पडली आहेतअजून 1400 मतांची मोजणी बाकी असली तरी दुसऱ्या फेरीत विजयाचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रकाश हुक्केरी यांनी यापूर्वी पाच वेळा आमदार, एकदा खासदार आणि तीन वेळा मंत्रीपद भूषविताना अत्यंत प्रभावी कार्य केले आहे. राजकारणात आपला असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सदलगा -एकसंबा जिल्हा पंचायत सदस्य या नात्याने केली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून ते विधान परिषदेमध्ये निवडून गेले. पुढे पाच वेळा आमदार होऊन त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली. त्यानंतर एकदा 2014 साली ते खासदार म्हणून निवडून आले. दिल्ली दरबारी लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश हुक्केरी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात तीन वेळा मंत्री देखील झाले. लोकसभेच्या निवडणुकीत गेल्या 2018 साली त्यांना अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ कार्यक्षम नेता म्हणून आज त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. एकेकाळी बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्रीपद भूषविताना अनेक विकास कामे करण्याबरोबरच बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेची अर्थात बीम्सची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि आता पुन्हा विधान परिषद असा प्रवास करणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांचे विशेष म्हणजे ते संघ संस्थांसह गरजूंना आणि विविध समाजांच्या कार्यक्रमांना सढळ हस्ते मदत करण्यात आघाडीवर असतात. आपल्या मतदार संघात विभिन्न विकास कामे करण्याबरोबरच सामाजिक योगदान मोठे असल्यामुळे हुकेरी जनमाणसात लोकप्रिय आहेत.Hukkeri prakash

जेंव्हा जेंव्हा ते लोकप्रतिनिधी होते तेंव्हा सरकार दरबारी गेल्यानंतर ते कधीच रिकाम्या हाताने परत येत नव्हते. एखाद्या प्रकल्पासाठी 50 लाखाचा निधी हवा असेल तर किमान 25 लाख तरी ते मंजूर करून घेऊन येत. थोडक्यात म्हणजे पाठपुरावा करून समस्या सोडवणे, विकास कामांसाठी निधी मंजूर करून घेणे यात त्यांचा हातखंडा आहे. ते जरी काँग्रेसचे नेते असले तरी त्यामुळे त्याचे इतर पक्षात देखील विकासासाठी चांगले वजन आहे. तत्कालीन काळात त्यांचे भाजपात चांगले वजन होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते.

पूर्वसूचना न देता थेट घरी जाऊन भेट घेण्याइतके त्यांचे मुख्यमंत्र्यांशी विश्वासार्ह स्नेहपूर्ण संबंध होते. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघातील विजयामुळे ते आता 2022 मध्ये दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. या पद्धतीने प्रकाश हुक्केरी यांच्या स्वरूपात समस्या सोडवणारा कार्यक्षम आमदार मिळाल्यामुळे शिक्षकवर्गात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.