Sunday, April 28, 2024

/

पाठ्यपुस्तक समिती बरखास्त नाही विसर्जित : मंत्री अश्वथ नारायण

 belgaum

राज्यातील पाठ्यपुस्तक पडताळणी समिती बरखास्त करण्यात आली नसून ती विसर्जित करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायणी दिले.

बेळगावमध्ये आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील पाठ्यपुस्तक सुधारणा वादासंदर्भात ते बोलत होते. मंत्री अश्वथ नारायण म्हणाले की, राज्यातील पाठ्यपुस्तक पडताळणी समिती बरखास्त करण्यात आली नसून ती विसर्जित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

रोहित चक्रतीर्थ यांच्या नेतृत्वाखालील पाठ्यपुस्तक पडताळणी समितीने त्यांच्यावर सोपविलेले काम पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. थोडक्यात या समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे ती समिती विसर्जित झाली आहे तिला बरखास्त केलेले नाही. सध्याच्या पाठ्यपुस्तकात कांही विसंगती अथवा समस्या असतील, भावना दुखावणाऱ्या बाबी असतील तर त्याचा विचार केला जाईल. त्याच प्रमाणे या संदर्भातील सल्ला-सूचना विचारात घेऊन पुढील कृती केली जाईल. आमचे सरकार समाज हिताचे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून विश्वासार्ह कार्य करत आहे. हा विश्वास अबाधित राखण्यासाठी आवश्यक ते क्रम घेतले जातील, असे मंत्र्यांनी सांगितले.

 belgaum

कायद्याचे उल्लंघन करणारी भावना दुखावणारी एखादी बाब असेल तर संबंधित पोलीस ठाणे अथवा सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करा असे सरकारनेही सांगितले आहे. समाजात कोणत्याही प्रकारची फूट पडावी असा सरकारचा विचार नाही. समाजातील सर्व वर्गातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करत सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार उत्तमरित्या कार्य करत आहे असे सांगून पाठ्यपुस्तकांमधील सुधारणांमध्ये व्यक्तिगत असे कांही नाही. पाठ्यपुस्तक पडताळणी समितीमध्ये रोहित चक्रतीर्थ हे कांही एकटेच नाहीत त्यांच्यासह आणखी चार -पाच जण त्या समितीमध्ये आहेत. त्यामुळे त्या समितीचा अहवाल हा व्यक्तिगत होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.Ashwath narayan

आम्ही सर्वजण आरएसएसचेच आहोत. आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही समाजातील सर्व जाती -धर्माच्या लोकांना एकत्रित करणारी, सर्वांना संघटित करून राष्ट्र उभारणीचे कार्य करणारी संघटना आहे. तेच कार्य आम्ही सर्वजण करत आहोत. आमचे सरकार कोठेही अपयशी ठरण्याचा प्रश्नच येत नाही. कारण परखड स्पष्टपणे आणि कायद्याच्या चौकटीत आमची सर्व कामे सुरु आहेत.

आम्ही कुठेही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही यासंदर्भात कांही लोक विनाकारण गैरसमज पसरवत आहेत, असे मंत्री अश्वथ नारायण यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.