Thursday, April 24, 2025

/

एडीजीपी अलोककुमार यांची कित्तुरला भेट

 belgaum

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोककुमार यांनी आज शनिवारी सकाळी वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे क्रांती स्थान कित्तूरला भेट दिली.

एडीजीपी अलोककुमार हे सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी कित्तूर येथे दाखल झालेल्या अलोककुमार यांनी प्रथम वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर कित्तूर पोलिस ठाण्याला भेट दिली. एडीजीपी अलोककुमार यांनी आपल्या पोलीस खात्यातील सेवेची सुरुवात बैलहोंगल तालुक्यात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केली होती.

त्यावेळी एसीपी यानात्याने अलोककुमार सर्वप्रथम बैलहोंगल पोलीस ठाण्यात सेवेसाठी रूजू झाले. बैलहोंगलमध्ये एसीपी म्हणून कार्य करत असताना त्यांनी देशी बनावटीच्या बंदुका तयार करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता. परिणामी संपूर्ण राज्यात ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यामुळे बैलहोंगल तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याबद्दल अलोककुमार यांना विशेष आपुलकी आहे.Alok kumar

कित्तूर पोलिस ठाण्याला आज दिलेल्या भेटीप्रसंगी अलोककुमार यांनी पोलीस ठाण्यातील कामकाजाची माहिती घेण्याबरोबरच तेथील पोलीस कर्मचाऱ्यांची आपुलकीने चौकशी केली.

याप्रसंगी बेळगाव उत्तरचे पोलीस महासंचालक (आयजीपी) सतीश कुमार, एस पी लक्ष्मण निंबरगी उपस्थित होते. यावेळी एडीजीपी अलोककुमार यांनी वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले. त्याचप्रमाणे त्यांनी कित्तूरमधील ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.