जगप्रसिद्ध संजय घोडावत ग्रुप लवकरच कित्तूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असून यामुळे 500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या समवेत बेळगावला आले असता मंत्री निराणी यांनी ही माहिती दिली. बेंगलोर सारख्या महानगरात व्यतिरिक्त मोठ्या उद्योग समूहाकडून आता लहान शहरांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली आहे.
त्या अनुषंगाने बेळगावमध्येही त्याची प्रचिती येणार आहे. जगप्रसिद्ध संजय घोडावत ग्रुप लवकरच कित्तूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असून
यामुळे 500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असे सांगून कणगला औद्योगिक वसाहतीमध्ये देशातील कांच उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेडकडून प्रशस्त दुकानाची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.