Friday, April 26, 2024

/

बायसिकल शेअरिंग योजनेची अंमलबजावणी सुरू

 belgaum

बेळगाव शहरात बायसिकल शेअरिंग योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला असून या योजनेसाठी शहरात 20 ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्यात येणार असले तरी संबंधित कंपनीने डॉकयार्डसाठी आणखी 15 जागांची मागणी बेळगाव स्मार्ट सिटी विभागाकडे केली आहे.

सध्या राज्यात म्हैसूर शहरात ‘ट्रिंग ट्रिंग’ या नावाने बायसिकल शेअरिंग योजना राबविली जात आहे. बेळगाव हे ही योजना राबवणारे राज्यातील दुसरे शहर ठरणार आहे. शहरात जे 20 डॉकयार्ड असणार आहेत. तेथे भाड्याने सायकली उपलब्ध होणार आहेत. या योजनेतील सायकलचा वापर केल्यास अर्ध्या तासासाठी 5 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे त्या पुढील कालावधीसाठी वाढीव शुल्क आकारले जाईल.

एका डॉकयार्डमध्ये किमान 10 सायकली असणार आहेत तिथून सायकल घेऊन नागरिकांना पुढील प्रवास करता येईल काम पूर्ण झाल्यानंतर शहरात कोणत्याही ठिकाणी सायकल ठेवण्याची मुभा असणार आहे. कंपनीकडून ती सायकल पुन्हा डॉक्यार्डमध्ये आणून ठेवली जाणार आहे. या योजनेसाठी एक ॲप तयार करण्यात आले असून ते ॲप ओपन करून क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सायकल अनलॉक होणार आहे.

 belgaum

सदर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात शहरात विविध ठिकाणी 20 डॉकयार्ड तयार करण्यात येणार आहेत. धरणी एंटरप्राइजेस या कंपनीला या योजनेचा ठेका मिळाला आहे. ठेकेदाराने या योजनेतील सायकली आणल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात कांही ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. त्या विभागात ही योजना प्राधान्याने राबविली जाणार आहे. धरणी एंटरप्राइजेस ला शहरात डॉक्टरसाठी आणखी 15 जागा हव्या असून त्यांनी तशी मागणी स्मार्ट सिटी विभागाकडे केली आहे.

शहरातील उद्यमबाग बस थांबा, खानापूर रोड, चेन्नम्मानगर बस थांबा, खानापूर रोड, आरपीडी क्रॉस, लेले मैदानानजीक (डीएचओ कार्यालय), देशमुख रोड दळवी कॉम्प्लेक्स समोर, गोवावेस व्यापारी संकुल, गोगटे सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक, कोल्हापूर सर्कल, जेएनएमसी -केपीटीसीएल रोड जंक्शन,

हनुमाननगर, सर्कल, एपीएमसी सर्कल, नेहरू रोड, बसवण्णा सर्कल, केएसआरटीसी इंटरसिटी बस स्टॉप, श्रीनगर उद्यान, गोल्फ कोर्स, महांतेशनगर बस थांबा, हिंडलगा गणपती मंदिर मागील बाजू व भरतेश होमिओपॅथिक कॉलेज (किल्ला) याठिकाणी बायसिकल शेअरिंगचे डॉकयार्ड तयार होत आहेत. हे डॉकयार्ड तयार झाल्यानंतरच योजनेतील सायकली बेळगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.