भारतीय चित्रपट सृष्टी टिकवायची असेल तर प्रत्येक प्रांतातील भाषा टिकली पाहिजे,कारण भाषा टिकली लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्यास मदत होईल व त्यामुळे चित्रपट सृष्टी विकसित होईल, अधिक प्रमाणात प्रसारीत होईल असे मत सिनेअभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.
तब्बल 17 वर्षांनी बेळगाव येथील स्वरूप नर्तकी सिनेमा गृहाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी स्वरूप नर्तकी मधील थिएटरची पहाणी केली.बेळगावच्या भेटीबाबत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी बेळगावात आलो होतो तब्बल 17 वर्षांनी मी परत बेळगावला आलोय, बेळगावच्या रसिकांची त्यांनी भरभरून स्तुती केली.
स्वरूप नर्तकी थिएटरची एकंदर कार्यपद्धती, प्रशासन आणि त्याच बरोबर बसलेली साऊंड सिस्टिम यंत्रणा व अविनाश पोतदार यांचे मन भरून कौतुक केले. चित्रपटगृह चांगले असतील तर प्रेक्षक निश्चितच सिनेमागृहाकडे वळतील. चांगल्या पद्धतीच्या अत्याधुनिक यंत्रणा असाल्यास त् प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास उल्हास वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केलं.
चित्रपटसृष्टी कोरोनामुळे गेली अडीच वर्षे स्तब्ध झाली होती, पण ती परत पूर्ववत होईल. पण चित्रपटगृहात येण्याची प्रेक्षकांना सवय परत लावावी लागेल असे मत त्यानी याप्रसंगी व्यक्त केले.जीवनपटा बरोबरच उत्तम कथानकावर, विनोदावर आधारित चित्रपट हे चांगल्या प्रमाणात चालतात असे मत त्यांनी व्यक्त केलं. श्री पिळगावकर यांना आदर्श असणारे विवेकानंदाच्या जीवनावर चित्रपट करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. ते त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहणार नाहीत,तर मी त्यात विवेकानंदांची भूमिका साकारणार असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्यावर असणारा विवेकानंदांचा प्रभाव त्या वेळी विशेष जाणवत होता.
कुठल्याही बजेटचा चित्रपट असेल, तरी तो बजेट मोठं आहे म्हणून केवळ चालत नाही, तर प्रेक्षकांना काय आवडतं हे महत्वाचं आहे. प्रेक्षकाला केंद्रस्थानी मानून चित्रपट बनवले पाहिजेत. फिल्म बनवणाऱ्यापेक्षा प्रेक्षक स्मार्ट आहेत त्यामुळे चित्रपट काढताना त्यांना केंद्रस्थानी मानून चित्रपट काढले तर ते अधिक चालतात. लोकांची आवडनिवड, सध्या लोकांचा कोणती माहिती हवी आहे. त्यांच्या नवीन चित्रपटाकडून काय अपेक्षा आहेत, चित्रपटात नावीन्य काय पाहिजे आहे याचा विचार करून कथानक तसे पाहिजे. असे देखील त्यांनी म्हटलं.
चित्रपट तर महत्त्वाचे आहेत पण नाटक, लाईव्ह परफॉर्मन्स, आर्ट नृत्य होतात ते देखील खूप महत्त्वाचे आहेत व ते निरंतर चालत राहणार आहेत. चित्रपटाची शक्ती ही नाटकातून किंवा स्टेजवरून येते असे त्यांनी मत व्यक्त केलं, त्यामुळे नाटक आणि चित्रपट चालतच राहतील. नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे कारण लोकांना जिवंत कला बघण्याची आवड निर्माण झालेली आहेअसेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
होतकरू कलाकारांना आणि अभिनेत्यांना संदेश देताना ते म्हणाले की ज्या भाषेतील चित्रपटात अभिनय करता त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असायला हवं तरच तुम्ही यशस्वी कलाकार व्हाल.