गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि परिसरामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला दिवसभर रिप रिप सुरूच होती सायंकाळी साडे सातच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत मे महिन्या समाप्तीला होणारी पेरणी बहुदा काही दिवसांनी पुढे जाणार आहे. वळीवाचा दणका आणि गुरुवारच्या जोरदार मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना आताओलि पेरणी करावी लागणार आहे.
बेळगाव शहर परिसरात गेल्या मंगळवार दुपारनंतर निर्माण झालेले ढगाळ पावसाळी वातावरण आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम होते. आज दुपारी तासभर पावसाचा शिडकावा झाल्यामुळे हवेतील गारठ्यात वाढ झाली आहे.
बेळगाव शहर परिसरात गेल्या मंगळवारी दुपारपासून आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यामुळे शहरवासीयांना सूर्यनारायणाचे दर्शन घडू शकले नाही. यात भर म्हणून आज दुपारी तासभर पावसाचा शिडकावा झाल्याने हवेतील गारठा वाढला. सततच्या पावसाळी ढगाळ वातावरणामुळे शहर परिसरातील जनजीवनात विशेष करून बाजारपेठेत नेहमीच्या उत्साह दिसत नव्हता. दुपारी झालेला पाऊस आणि ढगाळ अंधाराचे वातावरण यामुळे आज देखील बाजारपेठेतील बहुतांश दुकानदारांना दिवसाढवळ्या दुकानातील दिवे लावून आपले व्यवहार सुरु ठेवावे लागले होते.
कालचे दिवसभरातील ढगाळ कुंद वातावरण आज गुरुवारी देखील कायम होते. त्यात दुपारी पावसाने लावलेली हजेरी परिणामी हवेतील गारठ्यात अधिकच वाढ झाल्यामुळे नागरिकांना विशेष करून वृद्ध मंडळींना आज गरम कानटोप्या, मफलर, शाल, स्वेटर हे आपले ठेवणीतील गरम कपडे बाहेर काढावे लागले.
दरम्यान शहर परिसरातील हे कंटाळवाणे ढगाळ पावसाळी वातावरण येत्या रविवारपर्यंत कायम राहणार असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांकडून कळते.