Tuesday, April 23, 2024

/

‘दहावी’मध्ये बेळगाव, चिक्कोडीचे 10 टॉपर!

 belgaum

राज्यात आज गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याने घवघवीत यश संपादन केले असून राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या पहिल्या 143 विद्यार्थ्यांमध्ये या जिल्ह्यांमधील 10 विद्यार्थी -विद्यार्थिनींचा समावेश आहे.

बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण दहा विद्यार्थी -विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत राज्यात टॉपर बनले आहेत. परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळविणाऱ्या या दहा विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील तर उर्वरित 4 विद्यार्थी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील आहेत.

त्याचप्रमाणे यातील 3 विद्यार्थी कन्नड माध्यमाचे तर 7 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे आहेत. शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेत या पद्धतीने उज्वल यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.Dongre amogh

 belgaum

1) यरगट्टी पब्लिक स्कुल – कु. सहना रायर, 2) संगोळ्ळी रायण्णा निवासी शाळा नंदगड, खानापूर -स्वाती सुरेश तोलगी,3) न्यु सेकंडरी स्कुल भोज चिकोडी -वर्षा अनिल पाटील, (सर्व कन्नड माध्यम).

4) मोरारजी देसाई शाळा एकसंबा चिकोडी -शंभू शिवानंद खानाई, 5) केंब्रिज स्कुल रामदुर्ग -आदर्श बसवराज हालभावी, 6) एम. व्ही. हेरवाडकर स्कुल बेळगाव शहर -अमोघ एन. कौशिक, 7) बसवेश्वर शाळा रामदुर्ग -रोहिणी गौडर, 8) भगवान प्रौढ शाळा हारुगेरी -सृष्टी महेश पत्तार, 9) विद्यावर्धक शाळा अथणी -विवेकानंद महंतेश होन्याळी, 10) केएलएस स्कुल बेळगाव -वेंकटेश योगेश डोंगरे, (सर्व इंग्रजी माध्यम).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.