राज्यात आज गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याने घवघवीत यश संपादन केले असून राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या पहिल्या 143 विद्यार्थ्यांमध्ये या जिल्ह्यांमधील 10 विद्यार्थी -विद्यार्थिनींचा समावेश आहे.
बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण दहा विद्यार्थी -विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत राज्यात टॉपर बनले आहेत. परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळविणाऱ्या या दहा विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील तर उर्वरित 4 विद्यार्थी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील आहेत.
त्याचप्रमाणे यातील 3 विद्यार्थी कन्नड माध्यमाचे तर 7 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे आहेत. शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेत या पद्धतीने उज्वल यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) यरगट्टी पब्लिक स्कुल – कु. सहना रायर, 2) संगोळ्ळी रायण्णा निवासी शाळा नंदगड, खानापूर -स्वाती सुरेश तोलगी,3) न्यु सेकंडरी स्कुल भोज चिकोडी -वर्षा अनिल पाटील, (सर्व कन्नड माध्यम).
4) मोरारजी देसाई शाळा एकसंबा चिकोडी -शंभू शिवानंद खानाई, 5) केंब्रिज स्कुल रामदुर्ग -आदर्श बसवराज हालभावी, 6) एम. व्ही. हेरवाडकर स्कुल बेळगाव शहर -अमोघ एन. कौशिक, 7) बसवेश्वर शाळा रामदुर्ग -रोहिणी गौडर, 8) भगवान प्रौढ शाळा हारुगेरी -सृष्टी महेश पत्तार, 9) विद्यावर्धक शाळा अथणी -विवेकानंद महंतेश होन्याळी, 10) केएलएस स्कुल बेळगाव -वेंकटेश योगेश डोंगरे, (सर्व इंग्रजी माध्यम).