Thursday, March 28, 2024

/

राज्यस्तरीय जलतरणात दोन नवे राष्ट्रीय विक्रम

 belgaum

केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब व ॲक्वेरियस क्लब आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ तसेच कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2022 च्या तिसऱ्या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 व 100 मी बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत.

सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये आयोजित या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या काल शुक्रवारी तिसऱ्या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 29.77 सेकंद वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याचप्रमाणे 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये देखील नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना तिने ही शर्यत 1 मिनिट 4.60 सेकंदात पूर्ण केली. अशाप्रकारे बेळगाव मध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोन राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले आहेत.

स्पर्धेच्या काल शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या अंतिम फेरीच्या शर्यतींचा निकाल (पहिल्या तीन क्रमांकाचे विजते) पुढीलप्रमाणे आहे. 200 मी. मिडले (मुले) -नयन विघ्नेश पी. नेट्टाकल्लाप्पा ॲक्वेटिक सेंटर, विधीत एस. शंकर डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, पवन धनंजय बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर. 200 मी. मिडले (महिला) -ए. जिदिहा डीकेवी ॲक्वेटिक सेंटर, एस, लक्ष्या बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, अंशू देशपांडे डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर. 200 मी. मिडले (मुले) -आर. नवनीतगौडा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, यश कार्तिक बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, अमन सुनगार स्विमर्स क्लब बेळगाव. 200 मी. मिडले (मुली) -मानवी वर्मा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, विनिता नयन बसवणागुडी ॲक्वेटिक सेंटर, प्रियांशी मिश्रा गफ्रे स्विमिंग प्रोग्रॅम. 200 मी. मिडले (मुले) -विहान चतुर्वेदी बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर, ज्यास सिंग मॅटसे आयएनसी, वैभव प्रताप डीकेव्ही ॲक्वेटिक सेंटर.Swimming

 belgaum

200 मी. मिडले (मुली) -श्लेन सुनील डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, त्रिशा सिद्धू एस. डीकेव्ही ॲक्वेटिक सेंटर, सानवी मंगू डीकेव्ही ॲक्वेटिक सेंटर. 100 मी. बॅकस्ट्रोक (मुले) -उत्कर्ष संतोष पाटील बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर, ध्यान एम. ग्लोबल स्विम सेंटर, आकाश मणी बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर. 100 मी. बॅकस्ट्रोक (महिला) -रिधिमा वीरेंद्रकुमार बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, नीना वेंकटेश डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, शालिनी आर. दीक्षित डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर. 100 (मुले) -ईशान मिश्रा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, कुशल के. बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, अमन सुनगार स्विमर्स क्लब बेळगाव. 100 मी. बॅकस्ट्रोक (मुली) -प्रियांशी मिश्रा स्विमिंग प्रोग्रॅम, नक्षत्र गौतम बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, सिद्धी जी. शहा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर. 100 मी. फ्रीस्टाइल (मुले) -शरण श्रीधर मॅटसे आयएनसी, विहान चतुर्वेदी बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, जास सिंग मॅटसे आयएनसी. 100 मी फ्रीस्टाइल (मुली) – ॲलीसा स्वीडल रेगो डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, त्रिशा सिंधू एस. डीकेव्ही ॲक्वेटिक सेंटर, तन्वी गौरव विजयनगर ॲक्वेटिक सेंटर.

100 मी. बटरफ्लाय (मुले) -नयन विघ्नेश नेट्टा ॲक्वेटिक सेंटर, कार्तिकेयन नायर डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, उत्कर्ष संतोष पाटील बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर. 100 मी. बटरफ्लाय (महिला) निना व्यंकटेश डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, रसिका मांगले बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, नैशा शेट्टी डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर. 100 मी. बटरफ्लाय (मुले) -दर्शन एस. बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर, अक्षय ठकुरिया डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, हरीकार्तिक वेलू गोल्डन प्रिन्स स्पोर्ट्स क्लब. 100 मी. बटरफ्लाय (मुली) -धिनिधी देसिंघू डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, तनिशी गुप्ता डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, हसिका रामचंद्रा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर.

200 मी. ब्रेस्टस्ट्रोक (मुले) -विधीत एस. शंकर डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, शुभांग कुबेर बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर, आदित्य समरण ओलेट बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर. 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक (महिला) -एस. लक्षा बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर, सानवी एस. राव ग्लोबल स्विम सेंटर, दिया मधुकर डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर. 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक (मुले) -आर नवनीतगौडा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, डॅनियल पॉल जे. डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, दक्ष मट्टा बसवनागुडी ॲक्वेटिक सेंटर. 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक (मुली) -मानवी वर्मा डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर, नयन बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर, मिहिका दुत्ता डॉल्फिन ॲक्वेटिक सेंटर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.